बदलत्या जीवनशैलीचा सगळ्यात जास्त परिणाम झाला आहे तो आपल्या आहारविहारावर. त्यातून उद्भवणाऱ्या विकारांवर उपचार करताना काही पथ्यं सांभाळणं अपरिहार्य ठरतं.
मधुमेह, सूज, स्थौल्य, हृद्रोग, रक्तातील चरबी वाढणे, खाज, धाप, आमांश, रक्तदाबवृद्धी
पथ्य :
साधे पण सुरक्षित पाणी, बेलाच्या व पिंपळाच्या पानांचा काढा, बिनसायीचे दूध, गाईचे दूध, ताक, एरंडेल तेल.
ज्वारी, बाजरी, मेथीपूड मिसळलेली सुकी चपाती, मूग, मुगाची डाळ, कुळीथ, तूर, मसूर माफक प्रमाणात. राजगिरा अपवाद म्हणून सातू.
दुध्या, पडवळ, दोडका, टिंडा, परवल, कारले, घोसाळे, शेवगा, सुरण, सर्व पालेभाज्या शक्यतो उकडून खाव्यात. क्वचित अर्धे केळे, ताडफळ, बोरे, करवंद, संत्रे, वाफारून सफरचंद, माफक पोपई (तारतम्याने फळे खावीत. खूप मधुमेह असणाऱ्यांनी फळे वज्र्यच करावीत.)
मेथीपूड, जांभूळबी चूर्ण, ओली हळद, डोंगरी आवळा, पुदिना, लसूण, आले, सुंठ, जिरे, धने, कोथिंबीर.
व्यक्तिपरत्वे व बलपरत्वे किमान माफक व्यायाम; भरपूर फिरणे, मोकळी हवा, मातीवर किंवा हिरवळीवर अनवाणी चालणे, दीर्घश्वसन, सुती कपडे, वेळेवर झोप. रात्रौ फिरणे.
कुपथ्य :
गार पाणी, कोिल्ड्रक, वारंवार व कृत्रिम विविध प्रकारची पेये. अकारण चहा-कॉफी, कोको, ज्यूस, दही, सकस दूध.
गहू, जडान्न, तांदूळ, नाचणी, वरी, राजगिरा, मका, मसूर, साबुदाणा, शेंगदाणे, खोबरे, पोहे, चुरमुरे, भणंग, वाटाणा, हरभरा, चवळी, उडीद, मटकी, राजमा, बटाटा, रताळे, शिंगाडा, कांदा.
आंबा, अननस, चिक्कू, द्राक्षे, अंजीर, जांभूळ. बेकरीचे पदार्थ, फरसाण, आंबवलेले व शिळे अन्न, मिठाई, डालडायुक्त पदार्थ. सुकामेवा, मांसाहार.
व्यायामाचा अभाव, बैठे काम, दुपारी झोप, रात्रौ जागरण, चिंता, फाजील तणाव, फाजील श्रम, घाम न येईल असे कृत्रिम धाग्याचे कपडे, वातानुकूलित राहणी, दीर्घकाळचा बैठा प्रवास, मद्यपान, धूम्रपान.
मधुमेह, कृशता, वजन घटणे, रक्तदाबक्षय, थकवा, चक्कर
पथ्य :
माफक प्रमाणात गाईचे किंवा कमी फॅट असलेले म्हशीचे दूध. अल्प प्रमाणात साखर मिसळून कोकम सरबत, गोड ताक, तारतम्याने लोणी, बेलाच्या पानांचा, कमी साखर मिसळून चहा.
ज्वारी, बाजरी, सुकी चपाती, अल्प प्रमाणात नाचणी (रक्तशर्करेच्या प्रमाणावर अवलंबून) मूग, तूर, मसूर अल्प प्रमाणात इतर कडधान्ये. मेथीपूड मिसळून चपाती, सातू व मूग एकत्र पिठाची भाकरी.
सर्व पालेभाज्या, फळभाज्या (अपवाद सोडून) सुरण, ओली हळद, आवळा यांचे लोणचे. ताडफळ, बोरे, क्वचितच अल्प प्रमाणात केळे, तारतम्याने पोपई, वाफारून सफरचंद, डोंगरी आवळा, कोहळा.
ज्वारीच्या, बाजरीच्या, राजगिरा लाह्य. घरी भाजलेला पाव.
माफक प्रमाणात नियमित व्यायाम, रात्रौ जेवणानंतर फिरून येणे. वेळेवर झोप. मलमूत्रांचे वेग न अडविणे. छोटी उशी, कडक अंथरूण. शवासन.
कुपथ्य :
शंकास्पद पाणी, कृत्रिम पेये, कोिल्ड्रक, चहा, कॉफी, ज्यूस इ.
गव्हाची तेलकट-तुपकट चपाती, भात, उडीद, वाटाणा, हरभरा, मटार, चवळी, शेंगदाणे, खोबरे, खसखस. तीळ, ओट्स, सोयाबीन, पोहे, चुरमुरे, बेकरीचे किंवा आंबवलेले पदार्थ, फरसाण, मिठाई, पापड, मांसाहार.
बटाटा, रताळे, बिया असलेले वांगे.
आंबा, अननस, चिक्कू, मोसंबी, अंजीर, जांभूळ.
बैठे काम, दुपारी झोप, रात्रौ जागरण, चिंता, अकारण दगदग, व्यायामाचा अभाव, कोंदट हवा, जाड उशी, मलमूत्रांचा वेग अडविणे, मद्यपान, धूम्रपान, मशेरी, तंबाखू.

मूत्रपिंड व मूत्राशयाचे विकार, मूतखडा, मूत्राल्पता, मूत्राघात
पथ्य :
खात्रीचे भरपूर पाणी पिणे. ताजे गोड ताक, दही, नारळपाणी, कोकम सरबत, चंदनगंध पाणी. धने-जिरे पाणी, वाळा सरबत. कुळीथ कढण; भाताची पेज.
ज्वारी, जुना तांदूळ, नाचणी, भाताच्या, ज्वारीच्या किंवा राजगिरा लाह्य.
दुध्याभोपळा, पडवळ, दोडका, टिंडा, परवल, घोसाळे, बिनबियांचे काटेरी वांगे, बटाटा, रताळे, सुरण, तांबडा भोपळा, गाजर, बीट, कोथिंबीर, मुळ्याचा पाला, कोवळा मुळा.
कोहळा, डोंगरी आवळा, सर्व फळे. काळ्या मनुका.
धने, जिरे; माफक प्रमाणात सुंठ, आले, लसूण व इतर मसाले. वेळेवर जेवण व वेळेवर झोप, जेवणानंतर व तहान लागेल तेव्हा पुरेसे पाणी पिणे. मलमूत्रांचे वेग कटाक्षाने पाळणे.
कुपथ्य :
दूध, चहा, तीक्ष्ण पेये, तहान मारणे, गरम पाणी, मद्यपान, मध, रूक्ष कडधान्ये, मटकी, कुळीथ यांच्या उसळी. सोयाबीनसारखी जड धान्ये.
बिया असलेल्या फळभाज्या उदा. टोमॅटो, काकडी, वांगे, भेंडी, कोबी, काजू व सर्व पालेभाज्या.
जेवणावर जेवण, दुपारी झोप, रात्रौ जागरण, बैठे काम, कमी पाणी पिणे, मलमूत्रांचे विशेषत: लघवीचे वेग अडविणे; अकारण ॠतुचक्र चुकविण्याकरिता गोळ्या घेणे, संततिप्रतिबंधक औषधांचा वारंवार वापर, मशेरी, तंबाखू, धूम्रपान.

winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Carrot is beneficial for body how to make gajar ki kanji recipe in marathi
हिवाळ्यात सगळ्यात भारी, निरोगी, आणि चवदार गाजर कांजी! पिढ्यानपिढ्या बनवली जाणारी खास रेसिपी
what is the reason that Sea fish became expensive
मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?
Where a giant animal like a dinosaur was destroyed, what happened to microscopic organisms! Man should take the initiative to protect biodiversity know more about
जैवविविधतेच्या संरक्षणासाठी माणसानेच पुढाकार घ्यावा
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय

मूत्रपिंड विकार, क्रॉनिक रिनल फेल्युअर, मूत्राल्पता, पांडुता, नियमितपणे डायलेसिस करावे लागणे, मूत्रदोषाधिक्य, किडनी खराब होणे.
पथ्य :
सर्व पातळ किंवा द्रवपदार्थ एकूण ५०० मिलिच्या आतच घेणे. यात पाण्याचाही समावेश आला. दही, गोड ताक, लाह्य, उकळून पाणी, नारळपाणी, धनेपाणी.
लाह्य हे प्रधान अन्न. भात, राजगिरा किंवा ज्वारीच्या लाह्य.
ज्वारी, बाजरी, मधुमेह नाही त्यांच्याकरिता नाचणी. सुकी चपाती. मूग, मुगाची डाळ, सातू. केमिकलविरहित गूळ. सर्व फळभाज्या (बारीक बिया नसलेल्या), आले.
तारतम्याने फलाहार, ताडफळ, मोसंबी, चिक्कू, सफरचंद, डोंगरी आवळा, कोहळा.
वेळेवर जेवण, पुरेशी विश्रांती व झोप. मलमूत्रांचे व वायूचे वेग वेळच्या वेळी. दीर्घश्वसन, प्राणायाम.
कुपथ्य :
फाजील जलपान, चहा, कृत्रिम पेये, ज्यूस, दूध. मटकी, उडीद, वाटाणा, हरभरा, जेवणावर जेवण, जडान्न, बेकरीचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, फरसाण, मिठाई.
टोमॅटो, काकडी, वांगे, भेंडी, कोबी, पालेभाज्या, काजू, फार मसालेदार पदार्थ, लोणची मिरची, पापड, इडली, डोसा, ढोकळा, श्रीखंड, जिलेबी, व्हिनेगर शिरका.
मानसिक ताणतणाव, दुपारी झोप, रात्रौ जागरण, अवेळी जेवण, मलमूत्र व वायूचे वेग अडविणे. लॅसिक्ससारख्या सूज कमी करणाऱ्या गोळ्यांचा गैरवापर, मशेरी, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान.

निद्राल्पता, निद्रानाश, खंडित निद्रा, अस्वस्थपणा, झोप चाळवणे.
पथ्य :
खात्रीचे सुरक्षित, गरज पडल्यास उकळून गार केलेले ताजे पाणी. म्हशीचे दूध, दही, साबुदाणा पेज; खजूर, गूळ व जिरेयुक्त सरबत.
ज्वारी, गहू, जुना तांदूळ, साबुदाणा, सोयाबीन, ओट्स, मूग, तूर, मसूर, चवळी इत्यादी धान्ये व कडधान्ये तारतम्याने वापर. दोन घास कमी जेवण. लसूण, आले, सूंठ यांचा युक्तीने वापर. सर्व फळभाज्या व पालेभाज्या. ॠतुमानानुसार सर्व ताजी फळे. खात्रीचा पाव घरी भाजून टोस्ट करणे, मनुका, सुके अंजीर, जरदाळू, खारीक, अक्रोड, बदाम पिस्ता, खोबरे, खसखस यांचा एकत्रित किंवा आलटून पालटून तारतम्याने वापर. झोपताना दूध किंवा दूध-तूप घेणे.
किमान नियमित व्यायाम, रात्रौ भोजनानंतर किमान वीस मिनिटे फिरणे. सायंकाळी लवकर व कमी जेवण, झोपण्यापूर्वी कानशिले, कपाळ, तळहात, तळपाय यांना तूप चोळणे, नाकात तूप थेंब सोडणे. मलमूत्रांचे वेग वेळच्या वेळी करणे.
कुपथ्य :
शंकास्पद पाणी, ताक, निकस दूध, चहा, उत्तेजित पेये, खूप पाणी पिणे.
बाजरी, कुळीथ, मटकी, वाटाणा, हरभरा, वाल इत्यादी पोटात गुबारा निर्माण करणारी धान्ये, कडधान्ये. बटाटा, रताळे, शिंगाडा, कोबी, गाजर, फ्लॉवर, टोमॅटो, काकडी, हिरव्या सालीची केळी, फणस, चिक्कू, करवंदे, जांभूळ.
काजू, फरसाण, डालडायुक्त मिठाई, आंबवलेले पदार्थ, खूप तिखट, मसालेदार, चमचमीत जळजळीत पदार्थ, लोणचे, पापड, इडली, डोसा, ढोकळा, भजी, वडे, इ.
खूप वारे किंवा कोंदट हवा, अवेळी व वारंवार जेवण. अकारण उपवास, बैठे काम, व्यायामाचा अभाव, अतिरेकी श्रम, चिंता, फाजील बडबड, रात्रौ उशिरा व जड जेवण, स्वत:बद्दल खूप विचार. मशेरी, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान.

डोकेदुखी, शिर:शूल, मायग्रेन, सायनसचा त्रास, चक्कर, भणभण करणे, अर्धशिशी, फिट्स येणे
पथ्य :
सुरक्षित व खात्रीचे पाणी, दूध, लोणी, तूप, नारळपाणी, मध, तांदळाची पेज, पुरेशी साखर असलेली पेये. (मधुमेही सोडून)
ज्वारी, सुकी चपाती, जुना तांदूळ, ज्वारी व राजगिरा लाह्य. वेळेवर व माफक प्रमाणात भोजन.
ॠतुपरत्वे सर्व फळभाज्या व पालेभाज्या, डोंगरी आवळा, कोहळा, गोडद्राक्षे, पोपई, अंजीर, सफरचंद, वेलची केळे, जुन्या बाराचे मोसंबी. खात्रीच्या पावाचा घरगुती टोस्ट, मनुका, जरदाळू, बदाम, बेदाणा, अक्रोड, खसखस, खोबरे, देशी शेंगदाणे, (सुरकुत्या असलेले) ‘घरगुती गुलकंद, मोरावळा, कोहाळे पाक, दुधातील आलेपाक. पहाटे साजूक तुपातील शिरा खाणे. दीर्घश्वसन, प्राणायाम, किमान सहा सूर्य नमस्कार, नाकात तूप टाकणे, वेळेवर झोप, रात्रौ जेवणानंतर किमान वीस मिनिटे फिरणे. मलमूत्रांचे वेळच्या वेळी वेग करणे.
कुपथ्य :
खूप गार व फ्रीजमधील पदार्थ, गरम गरम पेये, अकारण चहा, कॉफी व कोिल्ड्रक, दही, बाजरी, कदन्न, मटकी, हिणकस व शिळे अन्न, अपुरे भोजन, उशिरा भोजन, अकारण उपवास, फार तिखट, आंबट व खारट भोजन, जेवणावर जेवण.
बटाटा, कांदा, कोबी, रताळे, शेपू, पालक, करडई, अंबाडी, अळू.
आंबवलेले, डालडायुक्त व बेकरीचे पदार्थ.
दुपारी झोप, रात्रौ जागरण, मलमूत्रांचे वेग अडविणे, पेनकिलर गोळ्या घेणे, झोपेच्या किंवा निसर्गाचे ॠतुचक्र चुक विण्याकरिता औषधे घेणे, डायरेक्ट पंख्याखाली दीर्घकाळ बसणे, झोपणे, फाजील उन्हात टोपीशिवाय फिरणे, डोळ्यांवर फाजील ताण.
चुकीच्या नंबरचा चष्मा, फाजील बडबड, खूप वेळ दूरदर्शन पाहणे. तंबाखू, मशेरी, धूम्रपान, मद्यपान.

केसांचे विकार, केस गळणे, पिकणे, कोंडा होणे, खवडे, खाज, डॅन्ट्रफ, चाई, आगपैण, उंवा, लिखा
पथ्य :
स्वच्छ, सुरक्षित पाणी, दूध, नारळपाणी, मध, गहू, ज्वारी, जुना तांदूळ, सुकी चपाती, नाचणी, मूग, टरफलासकट कडधान्ये, दुध्या भोपळा, पडवळ, दोडका, घोसाळे, टिंडा, परवल, चाकवत, राजगिरा, कोथिंबीर, माठ, पालक, मुळा, शेपू.
डोंगरी आवळा, कोहळा, मोसंबी, चिक्कू, वेलची केळे, अंजीर, ताडफळ, गोड द्राक्षे, धने, जिरे, माफक प्रमाणात आले व सुंठ, पुदिना.
आळणी व अनम्ल जेवण. केमिकलविरहित गूळ.
केस धुण्याकरिता आवळकाठी, शिकेकाई, नागरमोथा, बावची संत्र्यांच्या किंवा लिंबांच्या साली यांचे मिश्रण; सुती कपडे, डोके धुवावयास गार व शक्यतो क्लोरिनविरहित पाणी.
नारळाचे दूध काढून आटवून तयार केलेले खात्रीचे ताजे खोबरेल तेल केसांच्या मुळांकरिता वापरणे. पुरेसा घाम येईल इतपत व्यायाम.
कुपथ्य :
खराब व शंकास्पद पाणी, दही, ज्यूस, आंबट व खारट पेये, लिंबू सरबत, कैरी पन्हे, आंबट ताक, फाजील कृत्रिम पेये.
बाजरी, मटकी, कुळीथ, मसूर.
करडई, अंबाडी, लसूण, मिरची, खूप तिखट मसाला, आंबट, खारट पदार्थ, बेकरीचे व आंबवलेले पदार्थ, फरसाण, लोणचे, पापड, पाव, आंबट व खारट, चवीचा गूळ.
आंबट फळे, अननस, संत्रे, पोपई, लिंबू.
कोंडा असताना तेल वापरणे, शाम्पू, साबण, क्लोरिनचे फाजील प्रमाण असलेले पाणी, गरमागरम पाणी, कलप, खोटी मेंदी, डिझेल किंवा पेट्रोलियम पदार्थाशी सतत व वाढता संबंध. कृत्रिम धाग्यांचे कपडे.
मशेरी, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान.

त्वचाविकार : इसब, गजकर्ण, नायटा, खरूज, सोरायसिस, खवडे, कोड, पांढरे- काळे डाग, तारुण्यपिटिका, मुरुम, पुवाळ फोड, लालफोड.
पथ्य :
खात्रीचे सुरक्षित स्वच्छ पाणी, गाईचे दूध, नारळपाणी, मध, कोकम सरबत.
जुना तांदूळ, सुकी चपाती, ज्वारी, सातू, नाचणी, भाताच्या, राजगिरा किंवा ज्वारीच्या लाह्य, मूग, मुगाची डाळ. केमिकलविरहित गूळ.
दुध्याभोपळा, पडवळ, दोडका, टिंडा, परवल, कोथिंबीर, चाकवत, माठ, तांदुळजा, कोहळा, डोंगरी आवळा, चिक्कू , सफरचंद, ताडफळ, अंजीर, मोसंबी.
धने, जिरे, अनम्ल व अळणी जेवण. दोन घास कमी व वेळवर जेवण.
चंदनगंध व तुपाचा बाह्येपचार.
सुती कपडे, आंघोळीकरिता चणा पीठ व दूध; किंवा आवळकाठी चूर्ण व दूध; खूप पूं असल्यास खात्रीची हळदपूड व दूध. सुती कपडे, मोकळी हवा, वेळेवर झोप. मलमूत्र व वायूचे वेग वेळच्या वेळी पाळणे.
कुपथ्य :
खराब व शंकास्पद पाणी, दही, ज्यूस, आंबट खारट व लिंबू कैरी सरबते. शिकरण, फुट्रसॅलड. चहा, कॉफी व कृत्रिम पेये.
बाजरी, नवीन तांदूळ, तूर, मसूर, मटकी, वाटाणा, हरभरा.
करडई, अंबाडी, मेथी, शेपू, डिंगऱ्या, लसूण, कांदा, बटाटा, रताळे, हिरव्या सालीची केळी, संत्रे, अननस, आंबट व शिळी फळे.
बेकरी, फरसाण व आंबवलेले पदार्थ, लोणचे, पापड, पाव, श्रीखंड, जिलेबी, इडली डोसा, ढोकळा इ.
मीठ, लिंबू, चिंच, कैरी, व्हिनेगर, शिरका.
कोंदट हवा, ओल, समोरून येणारे गार वारे, खूप ऊन, कृत्रिम धाग्याचे कपडे, प्लॅस्टिक किंवा रबराची पादत्राणे, क्लोरिनचे फाजील प्रमाणचे पाणी.
साबण, सोडा इ. पेट्रोलियम पदार्थाशी संबंध. मलमूत्र व वायूंचे वेग अडविणे, भूक नसताना वरचेवर खाणे-पिणे. मशेरी, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान.

चेहऱ्याचे विकार तारुण्यपीटिका, मुरुम, चेहऱ्यावरील पुंवाळ किंवा लाल फोड, खड्डे, तेलकट चेहरा, रुक्ष चेहरा, चामखीळ, सुरकुत्या.
पथ्य :
स्वच्छ व सुरक्षित पाणी, खात्रीचे गाईचे दूध, ताजे गोड ताक, नारळपाणी, कोकम सरबत, मध, चंदनगंध पाणी. लोणी व माफक प्रमाणात तारतम्याने तूप.
ज्वारी, मूग, नाचणी, सातू, जुना तांदूळ, सुकी चपाती. दुध्याभोपळा, पडवळ, दोडका, टिंडा, परवल, काकडी, घोसाळे, कोवळा मुळा, राजगिरा, कोथिंबीर, चाकवत, माठ, तांदुळजा, पालक, चवळाई.
डोंगरी आवळा, कोहळा, वेलची केळे, मोसंबी, अंजीर, गोड द्राक्षे, गोड डाळिंब, ताडफळ, शहाळे, केमिकलविरहित गूळ, धने, जिरे, मनुका, तारतम्याने आले, सुंठ, मिरी. आळणी व अनम्ल जेवण. सायंकाळी लवकर व कमी जेवण.
मोकळी हवा, विविध प्रदूषणांपासून वाजवी संरक्षण; वैद्यक सल्ल्याने वाफ घेणे किंवा त्वचेला लेप; चंदनगंध किंवा हळकुंड, वेखंड यांचा तारतम्याने लेप. वेळेवर झोप. मलमूत्रांचे वेग वेळेत करणे. केसातील कोंडय़ाकरिता योग्य केश्यचूर्ण केस धुण्याकरिता.
कुपथ्य :
खराब पाणी, दही, चहासारखी तीक्ष्ण उष्ण व कृत्रिम पेये. ज्यूस इ.
नवीन भात, बाजरी, जडान्न, पोहे, मुरमुरे, भणंग, मेवामिठाई, फरसाण, डालडा, आंबवलेले पदार्थ, परान्न. हरभरा, वाटाणा, उडीद, मटकी, बटाटा, रताळे, टमाटू, करडई, अंबाडी, आळू, शेपू, मिरची, लोणचे, पापड, कैरी, पाव, शिळे अन्न.
हिरव्या सालीचे केळे, अननस, पोपई, आंबट फळे, मांसाहार. साबण, सोडा, शाम्पू, क्रीम, फेसपॅक, लिपस्टिक, मेकअप, मलमूत्रांचे वेग आडवणे. ॠ तुचक्र चुकवणारी औषधे, थायरॉईड किंवा अन्य तक्रारींकरिता पेनकिलर. मलावरोध करणारी राहणी व औषधे. दूषित वारे, जागरण, दुपारी झोप, मशेरी, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान.

मुखपाक, तोंड येणे, उष्णता, गळवे, लाल फोड, हातापायांची आग, गुदपाक
पथ्य :
स्वच्छ व सुरक्षित पाणी, खात्रीचे गाईचे दूध, लोणी, तूप, ताजे मधुर व किंचित तुरट चवीचे ताक, नारळपाणी, धने पाणी.
ज्वारी, सुकी चपाती, मूग, मुगाची डाळ, साबुदाणा, सातू, मधुमेहीसोडून सर्वाकरिता तांदूळ भाजून भात, जुना तांदूळ, नाचणी.
दुध्याभोपळा, पडवळ, दोडका, टिंडा, परवल, घोसाळे, काकडी, कोहळा, डोंगरी आवळा, चाकवत, राजगिरा, तांबडा माठ, तांदुळजा, कोथिंबीर, नारळाच्या ओल्या खोबऱ्याचे दूध, धने, काळ्या मनुका, गोड द्राक्षे, अंजीर, ताडफळ, जुन्या बाराचे मोसंब. वेळेवर व दोन घास कमी जेवण.
मोकळी हवा, माफक व्यायाम, सायंकाळी जेवणानंतर किमान पंधरा-वीस मिनिटे फिरून येणे, वेळेवर झोप. मलमूत्रांचे वेग वेळच्या वेळी करणे.
कुपथ्य :
खराब व शंकास्पद पाणी, दही, आंबट ताक, चहा, कृत्रिम पेये, कोल्ड्रिंक, ज्यूस.
बाजरी, कुळीथ, तूर, मसूर, गव्हापासून बनवलेले जड पदार्थ, उडीद, वाटाणा, हरभरा, मटकी, आंबवलेले व शिळे अन्न, बेकरीचे पदार्थ, फरसाण.
मुळा, गोवाद, डिंगऱ्या, सुरण, लसूण, मिरची, आले, पुदिना, शेवगा, शेपू.
हिरव्या सालीची केळी, अननस, पोपई, संत्रे, आंबट फळे, खजूर, काजू, तीळ, खसखस, हिंग, मोहरी, मेथ्या, मिरी, सुंठ, मांसाहार, लोणचे, पापड, इडली, डोसा, ढोकळा, शेव, भजी, शिरका, व्हिनेगार इ.
कोंदट हवा, व्यायामाचा अभाव, अतिरेकी काम, कमी पोषण, कदन्न, उशिरा जेवण, रागराग, चिंता, मलमूत्रांचे वेग अडवणे, फाजील बडबड, दुपारी झोप, जागरण, मशेरी, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान.

शीतपित्त, गांधी, चकंदळे, खाज, पोटातील उष्णता व बाहेरचा गारवा
पथ्य :
सुरक्षित पाणी, खात्रीचे दूध, तूप, लोणी, ताजे मधुर व तुरट चवीचे ताक, नारळपाणी.
ज्वारी, नाचणी, मूग, मुगाचे वरण.
दुध्याभोपळा, पडवळ, दोडका, टिंडा, परवल, कोहळा, काटेरी वांगी, घोसाळे, चाकवत, राजगिरा, लाल माठ, कोथिंबीर, तांदुळजा.
डोंगरी आवळा, अंजीर, गोड द्राक्षे, जुन्या बाराचे मोसंबी, सफरचंद, ताडफळ, कोकम व जिरेयुक्त सरबत. मनुका, जरदाळू, सुके अंजीर, केमिकलविरहित गूळ.
धने, जिरे, सुंठ, आले वापर तारतम्याने. मिरी व तूप यांचा बाह्य़ोपचारार्थ वापर, चंदनगंध व तुपाचा तारतम्याने लेप.
कोथिंबीर वाटून लेप; वेळेवर व माफक भोजन. रात्रौ कमी जेवण, सुती कपडे, मोकळी हवा. मलमूत्रांचे वेग वेळच्या वेळी करणे. आवश्यक ती विश्रांती घेणे.
कुपथ्य :
गरम गरम पाणी, गरम पेये, चहा, दही.
गहू, बाजरी, मका, तूर, मसूर, वाटाणा, हरभरा, उडीद, वाल.
बटाटा, सुरण, गोवार, मुळा, शेपू, मिरची, पालक, लसूण, करडई, अंबाडी, अळू, मेथी, अननस, पोपई, केळे, संत्रे, आंबा, फणस.
लोणचे, पापड, इडली, डोसा, ढोकळा, पाव, भजी, चिवडा, भणंग, पोहे, चुरमुरे, फरसाण, चमचमीत जेवण, आंबवलेले व शिळे अन्न, मांसाहार, शिकरण, फ्रुटसॅलड.
जेवणावर जेवण, रात्रौ उशिरा जेवण, उपवास, जागरण, डायरेक्ट पंख्याखाली झोपणे, साबण, सोडा, टेरिलिनसारखे कृत्रिम धाग्याचे कपडे, अकारण पेनकिलर व उष्ण औषधे घेणे, मलमूत्रांचे वेग आडवणे. मशेरी, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान.
वैद्य प. य. खडीवाले वैद्य – response.lokprabha@expressindia.com