अनिकेत वाणी

अनिकेत वाणी हे लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ‘सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहेत. क्रीडा जगताशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी पुणे येथील अग्रगण्य रानडे इन्स्टिट्यूटच्या वृत्तपत्र विद्या व संज्ञापन विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यादरम्यान सकाळ आणि आयबीएन लोकमत सारख्या संस्थांमध्ये इंटर्नशिप केली. त्यानंतर मुख्य पत्रकारितेची सुरुवात ‘पुणे मेट्रो’ या स्थानिक वृत्तवाहिनी मध्ये आधी वार्ताहर (Reporter) म्हणून केली आणि काही कालावधीनंतर उपसंपादक म्हणून काम करू लागले. दरम्यानच्या काळात अक्षरनामा या वेबपोर्टलवर फ्रीलांसर म्हणून काम केले. ब्रॉडकास्टिंग विभागात काम केल्यानंतर स्पोर्ट्सजेम या कंपनीसाठी एमआर अंड पीआर कन्सल्टंट म्हणून काम करताना अनेक डिजिटल वेबसाईटसाठी लेखन आणि संपादन केले आहे. नोटबंदीवर केलेल्या डिझरटेशनसाठी त्यांना पुण्याच्या पत्रकार संघाकडून विशेष पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांना बाय रोड कारने प्रवास करत वेगवेगळी ठिकाणे पाहण्याची आवड आहे. तसेच क्रिकेट, अॅथलेटिक्ससारख्या खेळात शाळा-महाविद्यालयीन स्तरावर सहभागी झाले होते. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल खेळाचे सामने पाहण्याची आवड आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी रॉयटर्सचा डिजिटल पत्रकारितेचा कोर्स केला. त्यांनी अरेना अॅनिमेशन मधून फोटोशॉप, कोरल ड्रॉ सारखे कोर्स केले आहेत. अनिकेत वाणी यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा त्यांच्या इमेलवर संपर्क साधू शकता.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या