इंद्रायणी नार्वेकर

पत्रकार लोकसता
महापालिका वार्तांकन, स्थानिक सामाजिक विषयाची बातमीदारी
Writing Interest politicle, social, civic issues
Alumni wilsonian

Water storage, project , dams , Mumbai, Water,
पाणीसाठा खालावला… प्रकल्प कागदावरच! मुंबईसाठीच्या सातही धरणांत ३३ टक्केच साठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत असून सध्या या धरणांत मिळून ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Mumbai, pigeons, municipal regulations,
कबुतरांना दाणे टाकल्यास मुंबई महापालिका दंड करणार …

भूतदया म्हणून प्राण्यांना, पक्ष्यांना अन्न खाऊ घालत असाल तर यापुढे पालिका तुम्हाला ५०० रुपये दंड करणार आहे.

अनिश पाटील) कुणाल कामराविरोधातील राज्यभरात दाखल गुन्हे मुंबई पोलिसांना वर्ग नाशिक ग्रामीण, जळगाव, मनमाड येथील गुन्हे वर्ग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विडंबनात्मक गाणे सादर केल्याप्रकरणी राज्यभरात तक्रारी लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर करणाऱ्या हास्य कलाकार कुणाल कामराविरोधातील तीन गुन्हे खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यात नाशिक ग्रामीण, जळगाव व नाशिक (नांदगाव) येथील प्रकरणांचा समावेश आहे. याप्रकरणी कामराविरोधात खार पोलीस ठाण्यात यापूर्वीच एक गुन्हा दाखल केला आहे. त्यात शिवसेनेकडून (शिंदे) मुरजी पटेल तक्रारदार आहेत. तीन गुन्हे वर्ग मनमाड येथील शिवसेना (शिंदे) शहर प्रमुख मयुर बोरसे यांच्या तक्रारीवरून मनमाड पोलिसांनीही कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यात कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांची बदनामी केल्याचा तसेच दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेष निर्माण केल्याचा आरोप आहे. याशिवाय जळगावचे शिवसेना (शिंदे) शहर प्रमुख संजय दिगंबर भुजबळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते प्रकरणही मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. नाशिक नांदगाव येथील हॉटेल व्यावसायिक सुनील शंकर जाधव यांच्या तक्रारीप्रकरणी दाखल गुन्हाही खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या तीन प्रकरणांसह शिवसेना नेते मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या सर्व गुन्ह्यांचा तपास आता एकत्रित करण्यात येणार आहे. सर्व गुन्हे खार येथील कार्यक्रमातील कामराच्या विडंबनात्मक गाण्याबद्दल आहेत. ही घटना खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे ते सर्व गुन्हे खार पोलिसांना वर्ग करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईतील गुन्ह्याची माहिती शिवसेना नेते मुरजी पटेल यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, २३ मार्च रोजी एका कार्यक्रमात असताना माझ्या मोबाइलवर आमच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याने पाठवलेली लिंक प्राप्त झाली. त्यात कुणाल कामराने कॉन्टीनेन्टल हाँटेल, रोड नं ०३, खार पश्चिम, मुंबई या ठिकाणी केलेल्या एका स्टॅण्डअप कॉमेडी शोच्या कार्यक्रमाची व्हिडीओ क्लिप प्रसारित केली होती. ती पाहिली असता त्यामध्ये कामरा स्टॅण्डअप कॉमेडी शोमध्ये शिवसेना व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची बदनामी करीत होता. ठाणे जिल्ह्यातील एक नेते असा उल्लेख करून त्यांनी विडंबनात्मक गाणे गायले. त्यामुळे एकमेकांप्रतीच्या भावना कलुशित होऊन दोन राजकीय पक्षांमध्ये व्देष भावना उत्पन्न होत आहे, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असल्याचे माहिती असून त्यांच्या नैतिक आचरणावर निंदाजनक वक्तव्य करून त्यांची बदनामी केली. तसेच आमच्या पक्षाच्या व आमच्या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाच्या एकमेकांप्रतीच्या भावना कलुषित करून दोन राजकीय पक्षांमध्ये व्देष भावना उत्पन्न केल्या म्हणून माझी त्याच्या विरोधात कायदेशीर तक्रार आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
भूखंड घेता का भूखंड… श्रीमंत मुंबई महापालिकेवर भूखंड विकण्याची वेळ का आली? किमती कमी करून तरी खरेदीदार मिळतील? फ्रीमियम स्टोरी

पालिकेकडे मालमत्ता कर आणि विकास नियोजन म्हणजेच पुनर्विकासातून मिळणारे उत्पन्न हे दोन महत्त्वाचे उत्पन्न स्रोत आहेत. येत्या काही वर्षांत दैनंदिन…

Mumbai road development news in marathi
रस्ते कॉंक्रीटीकरणाचा अजून ७० दिवस त्रास

अभियंत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जल अभियंता, मलनिःसारण प्रकल्प या विभागाच्या वाहिन्या, इतर प्राधिकरण, उपयोगिता संस्थांच्या वाहिन्या यांमुळे काही प्रमाणात रस्ते कामांना…

Coastal Road project is a costly project for Mumbai Municipal Corporation Mumbai news
सागरी किनारा मार्गाची देखभाल खर्चीक; मुंबई महापालिकेवर वार्षिक २०० कोटींचा बोजा

सागरी किनारा प्रकल्प अर्थात कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेसाठी येत्या काळात खर्चीक ठरणार आहे. या प्रकल्पाच्या देखभालीसाठी पालिकेला वार्षिक २००…

mumbai coastal Road green zone news
सागरी किनारा मार्गावर हरितक्षेत्र तयार करण्यासाठी पाच मोठ्या कंपन्या उत्सुक; रिलायन्स, रेमंड, जिंदालमध्ये स्पर्धा

कंपन्यांच्या सीएसआर फंडातून हे हरितक्षेत्र तयार करण्यात येणार असून त्याकरीता पालिका प्रशासनाने ४०० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्याची क्षमता असलेल्या…

Vishleshan on Mumbai Road Concretisation Delays
रस्त्यांच्या काँक्रीटीकरणामुळे मुंबईकर का त्रासले? किती रस्त्यांची कामे सुरू? किती दिवस चालणार?

सध्या संपूर्ण मुंबईत एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर रस्ते काँक्रीटीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. त्याकरिता मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदण्यात आले आहेत.…

Mumbai Municipal Corporation recovers Rs 5392 crore in property tax
मुंबई महापालिकेच्या मालमत्ता करापोटी ५३९२ कोटींची वसुली

आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असून आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलक विभागाने ५३९२ कोटी रुपये मालमत्ता कर…

Work on underground parking garages at worli acoastal road is in its final stages with capacity to park 392 car
सागरी किनारा मार्गालगत वरळी येथील भूमिगत वाहनतळांचे काम अंतिम टप्प्यात, ३९२ गाड्या उभ्या करण्याची क्षमता

सागरी किनारा मार्गालगत वरळी समुद्रकिनारा परिसरात दोन भूमिगत वाहनतळ बांधण्यात येणार आहेत. प्रत्येक वाहनतळात १९६ गाड्या उभ्या करण्याची क्षमता असून…

Traffic police take action against 3260 vehicles speeding on coastal road Mumbai print news
सागरी किनारा मार्गावर भरधाव वेगात धावणाऱ्या ३२६० वाहनांवर बडगा; साऊंड बॅरिअर लावण्याच्या वाहतूक पोलिसांच्या सूचना

आतापर्यंत सागरी किनारा मार्गावर मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवणाऱ्या ३२६० जणांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.

concrete road construction hit tree root in mumbai
काँक्रीटीकरणादरम्यान झाडांचे नुकसान; उद्यान विभागाकडून ३०० हून अधिक नोटीसा, सात ठिकाणी पोलीस ठाण्यात तक्रार

अनेक ठिकाणी झाडांची मुळे कापली गेल्यामुळे झाडे कलली आहेत. त्यामुळे उद्यान विभागाने गेल्याच आठवड्यात उपअधिक्षकांना झाडांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या…

high court petitions and allegations regarding drain cleaning in mumbai are resolved and work begins next week
प्रतिसादाअभावी किंमत निम्म्यावर, मुंबई पालिकेच्या क्रॉफर्ड मार्केट, वरळीतील जागांसाठी पुन्हा निविदा

मलबार हिल येथील जागेवर बेस्टचे विद्याुत उपकेंद्र असून बेस्टचा या जागेचा लिलाव करण्यास विरोध होता. त्यामुळे ही जागा लिलावातून वगळण्यात…

ताज्या बातम्या