मयूर रत्नपारखे

मयूर सुर्यकांत रत्नपारखे हे ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये वरिष्ठ उपसंपादक पदावर कार्यरत आहेत. स्थानिक, राज्यस्तरीतय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, सामाजिकसह विविध क्षेत्रांशी निगडीत असणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडींचे ते वार्तांकन करतात. प्रिंट, टीव्ही आणि वेब मीडिया असा एकूण मिळून १२ वर्षांचा पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव आहे. औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी(मास्टर ऑफ जर्नालिझम) मिळवलेली आहे. औरंगाबादमधील स्थानिक वृत्तवाहिनी ‘एमसीएन न्यूज’येथून वार्ताहार पदापासून त्यांनी पत्रकारितेच्या कामाला सुरुवात केली. यानंतर पत्रकारितेचे शिक्षण सुरू असतानाच ‘देवगिरी तरुण भारत’ दैनिकात वार्ताहार म्हणून रूजू झाले. पुढे ते ‘दैनिक भास्कर’ समुहाचे ‘दैनिक दिव्य मराठी’ वृत्तपत्र समुहात संपादकीय सहायक म्हणून रूजू झाले आणि नंतर तिथेच उपसंपादक पदावर त्यांची निवड झाली. यानंतर औरंगाबादेतच ‘दैनिक पुढारी’मध्ये त्यांना कामाची संधी मिळाली तिथे त्यांनी फ्रंट पेज, जिल्हा डेस्क, आर्थिक घडामोडींच्या बातम्या आदी जबाबदारी सांभाळली. पुण्यात आल्यानंतर सर्वप्रथम ते ‘दैनिक केसरी’ येथे उपसंपादक पदावर रूजू झाले. यानंतर फार अल्पकाळ पुण्यात ‘दैनिक पुढारी’मध्येही वरिष्ठ उपसंपादक म्हणून त्यांनी काम केल्यानंतर ते ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून २०१९मध्ये रूजू झाले. राज्यासह देशातील राजकीय घडामोडींमध्ये त्यांना विशेष रस आहे. याशिवाय, कॅमेरासमोर लाईव्ह रिपोर्टिंगचा अनुभव असल्याने अशाप्रकारे बातम्या करण्यासही आवडतात. महाविद्यालयीन काळात एनसीसी, नाटक, क्रिकेट संघातही त्यांचा सहभाग होता. नवीन व्यक्तींशी संवाद साधणे, नवीन ठिकाणी भेटी देणे, गाणी ऐकणे आदींची आवड आहे. मयूर रत्नपारखे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Fadanvis new
Kasba by-election : भाजपा मतदारांना पैसे वाटत असल्याच्या रविंद्र धंगेकरांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर कसबा गणपती मंदीरासमोर सपत्नीक उपोषणाला बसले आहेत.

devendra fadnavis on sanjay raut
“मी सनसनाटी निर्माण करण्यासाठी कधीही विधान करत नाही, जे विधान मी करतो…” देवेंद्र फडणवीसांचं संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर!

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या खळबळजनक विधानावर संजय राऊतांनी टीका केली होती.

Sachin Sawant and Shinde Fadnvis
“मविआ सरकार तोडताना केलेल्या मदतीची ही परतफेड आहे का?” सचिन सावंतांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल!

“येत्या महाशिवरात्रीला भाजपा नेत्यांना महाराष्ट्रातील शिवभक्तांना तोंड दाखवता येईल का?” असंही म्हणाले आहेत.

Ravindra Dhangekar and Tilak
Kasba Assembly By-Election : “…त्यामुळे पुणेकर भाजपाला नक्कीच जागा दाखवतील” टिळक कुटुंबीयांच्या भेटीनंतर रविंद्र धंगेकरांचं विधान!

मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेला अभिवादनदेखील केले.

Eknath Shinde and kartik
‘लोकशाही’ची अनोखी व्याख्या सांगून राज्यभरात प्रसिद्ध झालेल्या कार्तिकची मुख्यमंत्री शिंदेंनी भेट घेत केले कौतुक!

प्रजासत्ताकदिनी कार्तिकने ‘लोकशाही’ विषयावर केलेले भाषण तुफान व्हायरल झालं आहे.

congress sachin sawant on devendra fadnavis
“जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर चिखलफेक करायचे भाजपाचे षडयंत्र” काँग्रेस नेते सचिन सावंतांचा गंभीर आरोप!

“जनतेने डोळे उघडले नाहीत तर मनुवादाच्या जोखडात कायम जखडून घ्यावे लागेल”, असंही म्हणाले आहेत.

Deepak Kesarkar Sanjay Raut
“आम्हाला आव्हान देण्याऐवजी त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि…” संजय राऊतांच्या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर!

“आमचे मुख्यमंत्री दोन किंवा तीन तास फक्त झोप घेतात, त्यांना स्वप्न बघण्याएवढी सुद्धा फुरसत नसते.” असंही केसरकर म्हणाले आहेत.

Chandrakant Patil on Jayant Patil
पहाटेच्या शपथविधीबाबत जयंत पाटलांच्या खळबळजनक दाव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

या पहाटेच्या शपथविधीने गल्लीपासून ते दिल्लपर्यंतच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

AAP and BJP councillors clash during the election of Mayor and Dy Mayor at the Civic Centre in New Delhi
Delhi Mayor Elections : दिल्ली महापालिकेतील गदारोळानंतर अखेर निवडून आलेले नगरसेवक घेणार पहिल्यांदा शपथ!

दिल्लीचा महापौर हा आम आदमी पार्टीचाच होईल, असं नाही. येथे भाजपाचाही महापौर होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

Manish Sisodia and Tiwari
“केजरीवालांच्या हत्येचा भाजपाचा कट”, मनीष सिसोदियांच्या गंभीर आरोपावर मनोज तिवारींनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…

…. त्यामुळे त्या दोघांचे आपसात काय सुरू आहे, हे आम्हाला समजण्यापलीकडे आहे, असंही तिवारींनी म्हटलं आहे.

DNA Test
विश्लेषण : DNA म्हणजे काय, कोणी लावला होता शोध? श्रद्धा हत्याकांडाच्या तपासात कशी निभवणार महत्त्वपूर्ण भूमिका

बलात्कार आणि हत्या अशा गुन्ह्यांच्या तपासात विशेषकरून ‘डीएनए’ चाचणी ठरते महत्त्वाची.

ताज्या बातम्या