प्रज्वल ढगे हे लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ‘वरिष्ठ उपसंपादक’ (Senior Sub Editor) या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून पत्रकारिता तसेच एमबीएची पदवी संपादन केलेली आहे. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात ‘मराठवाडा साथी’ या वृत्तपत्रात जिल्हा वार्ताहर (District Reporter) या पदापासून केली. त्यानंतर ते ‘एएम न्यूज-संदन महाराष्ट्राचे’ या वृत्तवाहिनीत ‘उपसंपादक’ या रुजू झाले. तेथे इनपूट तसेच आऊटपूट अशा विभागांत त्यांनी काम केले. पुढे त्यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहीनीच्या डिजिटल टीममध्ये ‘उपसंपादक’ या पदावर राजकीय, मनोरंजन, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचे वार्तांकन केले. त्यांना वाचन करणे, नाटक-चित्रपट पाहायला आवडते. सामाजिक चळवळीत त्यांना विशेष रस आहे. प्रज्वल ढगे यांना यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.