११ ऑक्टोबर १९६८ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरू संत आडकोजी महाराजांच्या तसबिरीकडे कटाक्ष टाकून लौकिक जगाचा निरोप घेतला.
११ ऑक्टोबर १९६८ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरू संत आडकोजी महाराजांच्या तसबिरीकडे कटाक्ष टाकून लौकिक जगाचा निरोप घेतला.
मुलांचा खेळ मोडला की ती रडतात, तसेच आपले आहे. जाणत्या माणसाला एक घर मोडले तरी दुसरे उत्तम लाभेल म्हणून आनंदच…
‘वसुधैव कुटुंबकम’ संकल्पनेचे प्रवर्तक असणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना जपान येथील विश्वधर्म परिषदेत १८ राष्ट्रांनी सल्लागार म्हणून निवडले होते.
अनेक जण शहीद झाले. गुरुदेव सेवा मंडळाचे प्रथम अध्यक्ष क्रांतिसिंह गुलाबराव वाघांना फाशीची शिक्षा इग्रंजानी सुनावली.
संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दोन्ही संत अमरावती जिल्ह्यातील. दोघांचा स्नेह शेवटपर्यंत अतूट राहिला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात भूमिका घ्यावी म्हणून मुंबईतील लोहव्यापारी श्रीमंत पांडुरंग बोबडे यांनी मुंबईत महाराजांचा दौरा आयोजित केला.
पंचायत राज’ ही संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनीच १९५०मध्ये देशाला सर्वप्रथम दिली. म्हणूनच ग्रामगीतेला आधुनिक भारताची आचारसंहिता व युगग्रंथ संबोधले जाते.
शासनाला श्रीगुरुदेव सेवा मंडळाने मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापासून सैन्यभरती मोहिमेला सुरुवात करून हजारो जवान लष्करात पाठविले.
‘‘युद्धविरामाची घोषणा करूनही चीनने तिबेटमध्ये युद्धाची तयारी केल्याने चीनची दगाबाजी समोर आली.
धर्मवान लोकच तसे म्हणत असतील तर त्यांच्यासारखे देशद्रोही व धर्मघातकी विरळेच म्हणावयाचे! उद्योगाशिवाय धर्मवंतांचे जगणे भूमीला भार होणारेच होय.
‘भारतीय सिनेमातून चांगल्या कलाकृती समाजासमोर आल्यास सिनेमासृष्टी राष्ट्राचे प्रचारकेंद्र होऊ शकेल,’’ असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मांडले होते.
अस्पृश्यतेची भावना समाजाच्या हृदयातून जोपर्यंत नाहीशी होत नाही तोपर्यंत केवळ कायद्याने काहीही भागणार नाही. बदल हा अंत:करणातूनच झाला पाहिजे.’’