समलैंगिकतेबद्दल भारतीय समाजमनामध्ये अजूनही स्पष्टता नाही. समाज याविषयी तोंडात गुळणी धरून गप्प राहणे पसंत करतो. काहींच्या मते हा चर्चेचा विषय…
समलैंगिकतेबद्दल भारतीय समाजमनामध्ये अजूनही स्पष्टता नाही. समाज याविषयी तोंडात गुळणी धरून गप्प राहणे पसंत करतो. काहींच्या मते हा चर्चेचा विषय…
वेश्या आणि वेश्यावस्ती यावर ज्ञात मराठी साहित्यातले आजवरचे सर्वाधिक भेदक, परिणामकारक लेखन नामदेव ढसाळांनी केलेय हे सर्वश्रुत आहे.
‘गवाक्ष’ने अनेकांची ही ओढ अधिक तीव्र केली.. टोकदार केली. आज या जाणिवेचा समारोप करताना भारावून गेलोय.
वेशीबाहेर गावकुसाच्या उजव्या अंगाला असणाऱ्या आमराईत केकताडाच्या कोपऱ्यात तिचं खोपटंवजा घर होतं.
वाऱ्याच्या झुळकेनं उडून येणारी पानं गाडीच्या खिडकीतून अलगद आत येऊन पडत.
दुसऱ्या दिवशी कानूबाबा सहज विमलच्या घरी आला तेव्हा गप्पांच्या ओघात त्यानं सुनीतानं दिलेल्या सांगाव्याचा उल्लेख करताच विमल चाट पडली.
रस्त्याला लागून असलेल्या चिंचेच्या झाडाचा नाजूक पाला झड लागावी तसा पडत होता.
नरसू साळव्याचं दहा एकराचं रान होतं. रानाच्या मधोमध आठ परस खोल असलेली जुनी दगडी ताशीव विहीर होती- जिला कधी पाणी…
गडंगनेरांची रांग लागते. पाव्हणेरावळे घरात ठाण मांडून बसतात. दारापुढे मांडव उभा राहतो आणि बघता बघता लग्नाचा दिवस उजाडतो.
बांधालगतच्या काळ्या ढेकळाचं रान तुडवून पुढं जाताच ढासळत आलेल्या पांडवाच्या कडंला रुख्माईची समाधी होती
हरीदास गवळ्याचं घराणं मूळचं कर्नाटकमधलं. कधीकाळी त्याचे बापजादे गुरं घेऊन इकडं येऊन इथंच स्थिरावलेले.