समीर जावळे हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन ते करतात. इतिहास या विषयातली कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्युटमधून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. आपल्या पत्रकारितेची सुरूवात त्यांनी हिंदुस्थान समाचार या वेबसाईटपासून केली. वेबसाईटचा अनुभव घेतल्यानंतर एबीपी माझा आणि साम मराठी यांसारख्या चॅनल्समध्येही त्यांनी असोसिएट प्रोड्युसर आणि प्रोड्युसर या पदांवर काम केले आहे. त्यांच्याकडे एकूण १७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखती, ब्लॉग लिहिणं, चित्रपट पाहणं, लोकांशी संवाद साधणं, गिर्यारोहण, लेखन, कविता करणं त्यांना आवडतं. महाविद्यालयीन जीवनात नाटक आणि एकांकिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसंच गाणं म्हणण्याचीही आवड त्यांना आहे. समीर जावळे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
हिंदू मटण विक्रेत्यांना मल्हार प्रमाणपत्र मिळण्याच्या निर्णयाला नितेश राणेंनी धोरणात्मक पाठिंबा दिला आहे. त्यावरुन हलाल आणि झटका मटणाच्या मुद्द्यावरुन वाद…
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची तुलना रंग बदलणाऱ्या सरड्याशी केली होती. तसंच नुकताच त्यांना बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन हटवण्याचा…