समीर जावळे

समीर जावळे हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन ते करतात. इतिहास या विषयातली कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्युटमधून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. आपल्या पत्रकारितेची सुरूवात त्यांनी हिंदुस्थान समाचार या वेबसाईटपासून केली. वेबसाईटचा अनुभव घेतल्यानंतर एबीपी माझा आणि साम मराठी यांसारख्या चॅनल्समध्येही त्यांनी असोसिएट प्रोड्युसर आणि प्रोड्युसर या पदांवर काम केले आहे. त्यांच्याकडे एकूण १७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखती, ब्लॉग लिहिणं, चित्रपट पाहणं, लोकांशी संवाद साधणं, गिर्यारोहण, लेखन, कविता करणं त्यांना आवडतं. महाविद्यालयीन जीवनात नाटक आणि एकांकिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसंच गाणं म्हणण्याचीही आवड त्यांना आहे. समीर जावळे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
देशात भाजपाची सत्ता येईल आणि मोदी पंतप्रधान होतील असं वाटत नाही : ईश्वलाल जैन

देशात २०१४ ला जी मोदी लाट होती तशी काहीही परिस्थिती आता नाही. त्यावेळेपेक्षा निश्चितच चांगलं वातावरण सध्या देशात आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आणि निषेधार्ह : विजया रहाटकर

साध्वी प्रज्ञा जे बोलल्या ते चुकीचं आहे, त्यावर त्यांनी माफीही मागितली आहे. मात्र, मुळात त्यांनी असं बोलणंच चूक आहे असं…

जळगावात बचत गटाच्या महिलांचा ‘अब की बार मोदी सरकार’चाच नारा

जळगावात खान्देश पापड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पापड महोत्सवात जळगाव, रावेर येथील महिलांचा समावेश आहे.

लाट नाही तरीही पंतप्रधान होणार मोदीच!; जळगावमधील व्यापाऱ्यांना विश्वास

मोदी सरकारच्या काळात अनेक चांगले निर्णय झाले. व्यवहार डिजिटल करण्याचा निर्णयही चांगला आहे, त्यामुळे काळ्या व्यवहारांवर आळा बसण्यास मदत झाली…

रावेरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत निम्म्या खुर्च्या रिकाम्या

रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.

लोकसत्ता विशेष