सौरभ मोरे हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’मध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी संबंधित लेखनाची त्यांना आवड आहे. मुंबईतील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयातून त्यांनी मराठी या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयातून Master Of Communication And Journalism मध्ये पदव्युत्तर पदविकेचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी ‘मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट’ या युट्यूब वाहिनीसाठी मनोरंजन डेस्कसाठी कंटेट रायटिंगचे काम केले. ‘पिपिंगमून’ या मराठी एंटरटेनमेंट वेबपोर्टलसाठी रिपोर्टिंग आणि कंटेट रायटर म्हणून काम केले. ‘क्रिष्णकिरण’ या प्रोडक्शन कंपनी अंतर्गत सोनी मराठी आणि सन मराठी या वाहिन्यांवरील कथाबाह्य कार्यक्रमांसाठीचे काम केले. ‘इट्समज्जा’ या वेबपोर्टलसाठी डेस्क रिपोर्टर म्हणून काम केले. गेल्या ४-५ वर्षांपासून सौरभ मोरे यांना डिजिटल मीडियामध्ये एंटरटेनमेंट वेबसाईटसाठी बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे.
लेखनाबरोबर सौरभ मोरे यांना वाचन आणि फिरणे त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातील नवीन माहिती जाणून घेणे आणि त्यावर काम करण्यात रस आहे.
एकूण अनुभव – ४ वर्षे
पूर्वीचा अनुभव – मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट, पिपिंगमून, क्रिष्णकिरण (सोनी मराठी आणि सन मराठी), इट्समज्जा
लोकसत्ता डॉट कॉममध्ये २०२५ पासून कार्यरत.
सौरभ मोरे यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.