डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.