शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ६ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या ६ महिन्यांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ६ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
What Is 'Dry Dating'?
ही ‘Dry Dating’ची काय भानगड आहे बुवा? तरुणाईमध्ये एवढा का प्रसिद्ध आहे ट्रेंड, जाणून घ्या

2023 मध्ये, डेट वर गेल्यानंतर मद्यपान टाळणारा हा ‘ड्राय डेटिंग’चा ट्रेंड GenZ आणि सहस्राब्दी लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. काय आहे…

ताज्या बातम्या