सोनल चितळे

सोनल श्रीपाद चितळे या B.Sc. (गणित) पदवीधर असून १२ वर्षे गणित, विज्ञान हे विषय शिकवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. घरात ज्योतिषशास्त्र अभ्यासकांचा वारसा असल्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि अभ्यासपूर्वक ज्ञान संपादन करण्याकडे त्यांचा कल होता. दादरच्या ‘ संजीवनी वैद्यक ज्योतिष संशोधन मंडळ’ येथे त्यांनी ज्योतिषविद्येचे रितसर शिक्षण घेतले. २००३ पासून त्या ज्योतिष विषयक क्षेत्रात कार्यरत आहेत. होराप्रविण, हस्तसामुद्रिक प्रविण, ज्योतिषशास्त्री (पारंपरिक पद्धती), नक्षत्र ज्योतिष अलंकार (कृष्णमूर्ती पध्दती) हे अभ्यासक्रम त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. तर 2010 साली त्यांनी वास्तु भूषण, वास्तु विशारद हे अभ्यासक्रम पूर्ण केले असून पिरॅमिड वास्तू तज्ज्ञ म्हणून त्या कार्यरत आहेत. रत्न चिकित्सा शास्त्राही अभ्यासक्रम त्यांनी जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून पूर्ण केला आहे आणि रत्नतज्ज्ञ म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांनी M.A. Psychology.(IGNOU) २०१७ साली केले असून तेव्हापासून मानसशास्त्रीय समुपदेशक (Counselor) म्हणूनही त्या कार्यरत आहेत. गेली पाच वर्षे त्या साप्ताहिक लोकप्रभामध्ये राशीभविष्य नियमित लिहीत होत्या तर लोकप्रभा दिवाळी अंक व लोकप्रभा भविष्य विशेषांकात त्यांनी विशेष लेखन केले आहे.
zodiac-sign
राशिभविष्य : दि. २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२१

चंद्र आणि शुक्र या दोन स्त्री ग्रहांचा अग्नी तत्त्वातील राशीतून होणारा नवपंचम योग धिटाई, हिंमत आणि आत्मविश्वास देणारा योग आहे.

zodiac-sign
राशिभविष्य : दि. १५ ते २१ ऑक्टोबर २०२१

चंद्र-हर्षलचा लाभ योग हा संशोधनात्मक प्रगतीला पोषक योग आहे. एखाद्या गोष्टीचा नव्याने विचार कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून आवश्यक तो पाठिंबा मिळेल.…

zodiac-sign
राशिभविष्य : दि. ८ ते १४ ऑक्टोबर २०२१

रवी-चंद्राचा लाभ योग हा भाग्यकारक योग आहे. रवीचा अधिकार आणि चंद्राची नावीन्याची आस यामुळे नव्या कार्यात हिरिरीने सहभागी व्हाल. नोकरी-व्यवसायात…

zodiac-sign
राशिभविष्य : दि. १ ते ७ ऑक्टोबर २०२१

चंद्र-गुरूचा नवपंचम योग हा ज्ञानवर्धक योग आहे. शिक्षण वा कामकाजाच्या ठिकाणी ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. नोकरी-व्यवसायात नव्या गोष्टी शिकायला मिळतील.

zodiac-sign
राशिभविष्य : दि. १७ ते २३ सप्टेंबर २०२१

चंद्र-हर्षलचा लाभ योग हा स्पष्टवक्तेपणाला पाठिंबा देणारा योग आहे. हर्षलची संशोधक वृत्ती आणि चंद्राचे कुतूहल यामुळे नावीन्यपूर्ण घटना घडतील.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या