
एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये आली की ती ताबडतोब पूर्ण करण्यावर तुमचा भर असतो.
एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये आली की ती ताबडतोब पूर्ण करण्यावर तुमचा भर असतो.
उसने अवसान आणून काम करणे म्हणजे काय ते तुमच्याकडे बघून समजेल.
सभोवतालची परिस्थिती खूप जरी चांगली नसली तरी तुमच्या प्रगतीला थोडीफार पूरक आहे.
नोकरीच्या ठिकाणी तुमची गरज वरिष्ठांना कळल्यामुळे तुमच्या अडचणी काही प्रमाणात कमी होतील.
‘कळतं पण वळत नाही’ या म्हणीचा अर्थ आता तुम्हाला एखाद्या निमित्ताने कळेल.
‘कठीण समय येता कोण कामास येतो’ या म्हणीप्रमाणे सभोवतालच्या व्यक्तींचे अंतरंग समजेल.
एखादा नवीन प्रश्न उद्भवल्यामुळे तुमचे गणित कोलमडून पडण्याची शक्यता आहे.
गुरू षष्ठस्थानात येईल. तुमची परिस्थिती ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी करणारी आहे.