सिस्टर लीला यांचा आनंदवनातील पहिला मुक्काम दीड- दोन महिन्यांचा होता.
विहिरीतून पाणी उपसण्यासाठी बाबांनी डिझेल इंजिन वापरणं सुरू केलं, तेही या पन्नाशीच्या दशकातच.
आनंदवनात येणाऱ्या पाहुण्यांची आम्ही ‘आवडते’ आणि ‘नावडते’ अशी विभागणी केली होती.
मध्य प्रदेशातील इतर जिल्ह्यंमधून आणि इतर राज्यांमधूनही कुष्ठरुग्ण आनंदवनात येऊ लागले होते.
दत्तपूर कुष्ठधामाचे संस्थापक मनोहरजी दिवाण यांच्याशी बाबा कायम संपर्कात असत.
कुष्ठरोगाचे जिवाणू मुख्यत: माणसाच्या चेतातंतूंच्या बाह्यवरणावर (Nerve Sheath) हल्ला करतात.
आनंदवनाच्या या सुरुवातीच्या काळात माझं वय होतं चार वर्षांचं आणि प्रकाश तीनचा.
जसजसं शेतातलं बी रुजत होतं तसतसं कुष्ठरोग्यांच्या मनातही आत्मविश्वासाचं बी रुजत होतं.
दुसऱ्या दिवशी जमिनीचा एक खोलगट भाग बाबांनी निवडला. इंदूने रानफुलांनी त्या जागेची पूजा केली,
खरी गोष्ट सुरू होते ती इथून. कुष्ठकार्याच्या नव्या दिशेबद्दल बाबांनी नॉर्मा शिअररला पत्राद्वारे कळवलं.
ऐकतील ते बाबा कसले! दत्तपूर कुष्ठधामाचे डॉ. जोशी या प्रशिक्षणादरम्यान बाबांचे सहाध्यायी होते.
तिथे कदाचित खोलीचा एखादा कोपरा मिळू शकेल असं त्यांना वाटलं. बाबा लगेचच तिथे गेले.