आजूबाजूच्या इमारती, त्यांच्या भिंती ग्राफिटी चित्रांनी रंगलेल्या दिसतात.
गेली ३३वर्षे विनायक परब पूर्णवेळ पत्रकारितेत असून सुरुवातीस मुंबई तरुण भारत (१९९०-९१) नंतर सांज लोकसत्ता (१९९२-९७), लोकसत्ता (१९९७- २०१२), लोकप्रभा (२०१२-२०२२) मध्ये कारकीर्द करून सध्या ते लोकसत्ता डॉटकॉमचे कार्यकारी संपादक आहेत. यापूर्वी २०००- २००६ या कालखंडात त्यांनी लोकसत्ता मुंबई डेस्क प्रमुख म्हणून तर २००६- १२ या कालखंडात त्यांनी मुंबई ‘लोकसत्ता’चे महानगर संपादक म्हणूनही काम पाहिले.
संरक्षण, विज्ञान तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण आदी विषयांवर त्यांचे विपुल लेखन असून या सर्व विषयांमध्ये तज्ज्ञ म्हणून त्यांचा वेगळा परिचय आहे. ते पुरातत्वज्ञ असून पुरातत्व आणि बौद्ध अभ्यास या दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये त्यांना मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. २०१४ साली एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने त्यांना बुद्धीस्ट स्टडीज या विषयात फेलोशिप देऊन सन्मानित केले. बौद्ध ज्ञानशास्त्राचा आधार भारतीय संरक्षण दलांच्या धोरणात्मक निर्णयासाठी कसा घेतला जाऊ शकतो, यावर संशोधनप्रबंध सादर केला आहे. जम्मू आणि काश्मीर त्याचप्रमाणे तेथील दहशतवाद या विषयाचा त्यांचा गेल्या २० वर्षांहून अधिक अभ्यास असून काश्मीरमधील अनेक दहशतवादीविरोध कारवायांचे त्यांनी प्रत्यक्ष वार्तांकन केले आहे. त्यासाठी त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे २००६ साली रायकर- बोस शोधपत्रकारीता पुरस्काराने गौरविण्यातही आले आहे. २००६ सालीच त्यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल द. म. सुतार पुरस्कारही प्राप्त झाला. तर मुंबईच्या इतिहासाचा शोध घेणाऱ्या सिटीवॉक मुंबई या तब्बल १२ वर्षे चाललेल्या लोकसत्तामधील स्तंभलेखनासाठी मानाचे समजले जाणारे भ्रमंतीकार प्रमोद नवलकर मानचिन्ह देऊन त्यांना २००९ साली गौरविण्यात आले. विनायक परब यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
आजूबाजूच्या इमारती, त्यांच्या भिंती ग्राफिटी चित्रांनी रंगलेल्या दिसतात.
मुंबई-पुण्याकडे राहून संरक्षणाच्या बाबतीत आपले लक्ष ईशान्य भारताकडे फारसे जात नाही.
सर्वाच्या तोंडी ‘इंडो-पॅसिफिक’ हा शब्दप्रयोग खूप मोठय़ा प्रमाणावर ऐकू येतो.
एखादी गोष्ट तितकीच अस्सल हवी असेल तर ती त्या मातीतून यावी लागते
धर्म-देवता याबाबत संशोधन करून हाती काय लागणार, असा प्रश्न विचारला जातो.
मोकळी जमीन असलेल्या राष्ट्रीय उद्यान आणि आरेच्या परिसराने आपल्याला वाचवले.