निवडणुका जवळ येत आहेत तसा आता महाराष्ट्रातही जंगी ‘सामना’ रंगू लागला आहे.
गेली ३३वर्षे विनायक परब पूर्णवेळ पत्रकारितेत असून सुरुवातीस मुंबई तरुण भारत (१९९०-९१) नंतर सांज लोकसत्ता (१९९२-९७), लोकसत्ता (१९९७- २०१२), लोकप्रभा (२०१२-२०२२) मध्ये कारकीर्द करून सध्या ते लोकसत्ता डॉटकॉमचे कार्यकारी संपादक आहेत. यापूर्वी २०००- २००६ या कालखंडात त्यांनी लोकसत्ता मुंबई डेस्क प्रमुख म्हणून तर २००६- १२ या कालखंडात त्यांनी मुंबई ‘लोकसत्ता’चे महानगर संपादक म्हणूनही काम पाहिले.
संरक्षण, विज्ञान तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण आदी विषयांवर त्यांचे विपुल लेखन असून या सर्व विषयांमध्ये तज्ज्ञ म्हणून त्यांचा वेगळा परिचय आहे. ते पुरातत्वज्ञ असून पुरातत्व आणि बौद्ध अभ्यास या दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये त्यांना मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. २०१४ साली एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने त्यांना बुद्धीस्ट स्टडीज या विषयात फेलोशिप देऊन सन्मानित केले. बौद्ध ज्ञानशास्त्राचा आधार भारतीय संरक्षण दलांच्या धोरणात्मक निर्णयासाठी कसा घेतला जाऊ शकतो, यावर संशोधनप्रबंध सादर केला आहे. जम्मू आणि काश्मीर त्याचप्रमाणे तेथील दहशतवाद या विषयाचा त्यांचा गेल्या २० वर्षांहून अधिक अभ्यास असून काश्मीरमधील अनेक दहशतवादीविरोध कारवायांचे त्यांनी प्रत्यक्ष वार्तांकन केले आहे. त्यासाठी त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे २००६ साली रायकर- बोस शोधपत्रकारीता पुरस्काराने गौरविण्यातही आले आहे. २००६ सालीच त्यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल द. म. सुतार पुरस्कारही प्राप्त झाला. तर मुंबईच्या इतिहासाचा शोध घेणाऱ्या सिटीवॉक मुंबई या तब्बल १२ वर्षे चाललेल्या लोकसत्तामधील स्तंभलेखनासाठी मानाचे समजले जाणारे भ्रमंतीकार प्रमोद नवलकर मानचिन्ह देऊन त्यांना २००९ साली गौरविण्यात आले. विनायक परब यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
गेली सुमारे पंधरा वर्षांहून अधिक काळ आपण भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सातत्याने बोलत आहोत.
पूर्वी एखादे छायाचित्र टिपतानाच छायाचित्रकार भरपूर विचार करायचा.
गांधीजींच्या कौटुंबिक आयुष्यातील अनेक क्षण या प्रदर्शनात पाहायला मिळतात.
आजवर आपण खूप प्रख्यात चित्रकार पाहिलेले असतात, त्यांच्या कलाकृती पाहिलेल्या असतात.
१९७० ते ८० या वीस वर्षांमध्ये या विषयाशी संबंधित अनेक संशोधन प्रकल्प बंद पडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चलनीकरणाचा निर्णय घेतल्याच्या निर्णयाला आता ५० दिवस उलटत आले.
मांडणा हा राजस्थान आणि मध्य प्रदेशातील कलाप्रकार असून आपल्याकडील रांगोळीशी याचे बरेचसे साधम्र्य आहे.
सध्या सर्वत्र देशभरात चर्चा सुरू आहे ती निश्चलनीकरणाची अर्थात नोटाबंदीची.