गेल्या अनेक दिवसांपासून नव्या ऑडी एसयूव्हीची वाट पाहात असलेल्या कारप्रेमींची प्रतीक्षा संपली आहे. जर्मन लक्झरी कार उत्पादक ऑडीने भारतात नवीन Q7 लॉन्च केला आहे. ऑडी Q7 आकर्षक डिझाइनसह उत्तम कामगिरी आणि चालवताना आरामदायी आनंद घेता येणार आहे. ऑडी Q7 प्रिमियम प्लस व्हेरियंटची सुरुवातीची किंमत ७९ लाख ९९ हजार रुपये आहे. ऑडी Q7 टेक्नॉलॉजी व्हेरिएंटची किंमत ८८ लाख ३३ हजार रुपये (एक्स-शोरूम) आहे.
नवीन ऑडी Q7 मध्ये डायनॅमिक ३.० लिटर व्ही ६ टीएफएसआय इंजिनद्वारे समर्थित आहे. एक ४८ वॅट माइल्ड हायब्रिड प्रणाली देखील आहे. जी ३४० अश्वशक्ती आणि ५०० एनएम टॉर्क तयार करते. माइल्ड हायब्रिडमध्ये ४८ वॅट विद्युत प्रणाली समाविष्ट आहे, जी बेल्ट अल्टरनेटर स्टार्टरला (BAS) पुरेशी उर्जा प्रदान करते. उंचीवरून खाली उतरताना, ही यंत्रणा ४० सेकंदांसाठी इंजिन बंद करते. सिस्टमच्या मागणीनुसार BAS इंजिन स्वयंचलितपणे वाहन रीस्टार्ट करते. टॉप स्पीड २५० किमी प्रतितास आहे. ऑडी Q7 ० ते १०० किमी प्रतितास ५.९ सेकंदात वेग वाढवते. पॉवरफुल क्वाट्रो ऑल व्हील ड्राइव्ह, अडॅप्टिव्ह एअर सस्पेंशन आणि ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट सात ड्रायव्हिंग मोड्ससह (ऑटो, कम्फर्ट, डायनॅमिक, एफिशिएंसी, ऑफ-रोड, ऑल-रोड आणि इंडिविज्युअल) ऑडी Q7 चांगला ड्रायव्हिंग अनुभव देते.
ऑडी इंडिया हेडबलबीर सिंग ढिल्लन म्हणाले की, “वर्षाच्या सुरुवात ऑडीने भारतात चांगली कार लाँच करून केली आहे. अनेक वर्षांपासून ऑडी Q7 आमच्या Q श्रेणीचे प्रतीक आहे. नवीन मॉडेल त्याच्या नवीन लुक आणि अपग्रेड केलेल्या वैशिष्ट्यांसह सर्व गाड्यांना मागे टाकेल. ऑडी Q7 ची रोड आणि ऑफ रोड दोन्हीवर उत्कृष्ट कामगिरी आहे, ज्यामुळे हे वाहन इतर वाहनांपेक्षा वेगळे आहे.”