Bajaj Platina Bike: पेट्रोलच्या दरांमुळे वाहनचालकांचा खिसा दररोज खाली होतोय. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे प्रति लिटर दर १०० रुपयांपेक्षा जास्त झालेत. अशात पैशांची बचत करण्यासाठी दमदार मायलेज देणारी चांगला पर्याय ठरू शकते. अनेकजण जबरदस्त मायलेज देणाऱ्या बाईकच्या शोधात आहेत. जर तुमचं बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बजाज कंपनीची शानदार मालयेजवाली बाईक देशात लाँच झाली आहे. ही बाईक तुम्हाला जबरदस्त फीचर्ससह स्वस्तात खरेदी करता येणार आहे. चला तर जाणून घेऊया ही बाईक कशी असेल खास.
बजाज ऑटोने केली ‘ही’ बाईक लाँच
बजाज ऑटोने भारतीय बाजारपेठेत Bajaj Platina 110 ABS लाँच केली आहे. नवीन बजाज प्लॅटिना ११० ABS चे पॉवरिंग ११५.४५ सीसी सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन आहे जे ७,००० RPM वर ८.४ bhp आणि ५,००० RPM वर ९.८१ एनएम पीक टॉर्क विकसित करते.
(हे ही वाचा : Flashback 2022: २०२२ मध्ये ‘या’ टॉप ५ MPV खरेदीसाठी तुटून पडले भारतीय; पाहा यादी!)
Bajaj Platina 110 ABS फीचर्स
Platina 110 ABS ला टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल स्प्रिंग-लोडेड शॉक शोषक मिळतात. वैशिष्ट्यांच्या बाबतीत, याला एक डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो जो अनेक माहिती दर्शवतो. इंजिन ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकला टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल स्प्रिंग-लोडेड शॉक ऍब्जॉर्बर्स मिळतात. बाईकला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळते, जे बरीच माहिती प्रदर्शित करते. यामध्ये गीअर पोझिशन, गियर गाईडन्स व्यतिरिक्त तुम्हाला ABS अलर्ट देखील मिळतो.
बजाज ऑटोचे अध्यक्ष सारंग कानडे म्हणाले, जगभरात सर्वाधिक अपघात भारतामध्ये होतात आणि या अपघातांपैकी ४५ टक्के अपघात दुचाकी वाहनांचे आहेत. नवीन Platina 110 ABS ची ब्रेकिंग सिस्टीम मजबूत करण्यात आली आहे. यामुळे तुमच्यासाठी ही बाईक सुरक्षित असेल,असे त्यांनी नमूद केले.
Bajaj Platina 110 ABS किंमत
भारतात २०२३ बजाज प्लॅटिना 110 ABS ची प्रारंभिक किंमत ७२,२२४ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ११०सीसी सेगमेंटमधील ही पहिली आणि एकमेव मोटरसायकल आहे जी ABS सह आली आहे. कंपनी या बाइकसोबत चार कलर ऑप्शन्सही देत आहे.