Hyundai Alcazar 2023 Launched: Hyundai Motor ने त्यांच्या Hyundai Alcazar SUV च्या सहा आणि सात सीटर व्हेरियंटच्या किमती जाहीर केल्या आहेत. या SUV चे इंजिन अपडेट करण्यासोबतच कंपनीने त्याचे सुरक्षा फीचर्स आणि फ्रंट ग्रिल देखील अपडेट केले आहेत. तुम्हालाही या SUV च्या लाँचिंगची वाट होती , तर या SUV च्या किंमतीसह संपूर्ण तपशील दहा पॉइंट्समध्ये जाणून घ्या.

New Hyundai Alcazar highlights

१. कंपनीने चार ट्रिम पर्यायांसह Hyundai Alcazar SUV बाजारात आणली आहे. ज्यामध्ये पहिली ट्रिम प्रेस्टीज, दुसरी प्लॅटिनम, तिसरी प्लॅटिनम (O) आणि चौथी सिग्नेचर (O) आहे.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
pinaka rocket system france
भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट लाँचर्सची मागणी जगभरात; कारण काय? काय आहेत याची वैशिष्ट्ये?
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल

२. मॉडेल वर्ष २०२३ सादर करताना, कंपनीने Hyundai ALCAZAR मध्ये साहसी आणि स्पोर्टी ड्रायव्हिंग अनुभवासाठी नवीन १.५ Turbo GDi पेट्रोल इंजिन दिले आहे.

(हे ही वाचा : मारुतीच्या ‘या’ मिडसाइज एसयूव्हीची Hyundai Creta वर मात, किंमत १०.४५ लाख, मायलेज २८ किमी )

३. नवीन १.५L GDI पेट्रोल इंजिन RED नियमांचे पालन करते आणि E20 इंधनाला समर्थन देते. हे इंजिन ७DCT आणि ६MT ट्रान्समिशन पर्यायांसह देण्यात आले आहे.

. नवीन 1.5L GDI पेट्रोल पॉवरट्रेन विभागातील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता आणि टर्बो पॉवर देते. हे इंजिन १६० PS पॉवर आणि २५३ Nm पीक टॉर्क जनरेट करते.

५. Hyundai ALCAZAR ला 1.5L डिझेल CRDi इंजिन देखील मिळेल जे RDE नियमांचे पालन करते. हे इंजिन ११६ PS पॉवर आणि २५० Nm पीक टॉर्क जनरेट करते.

६. नवीन Hyundai Alcazar 2023 (New Hyundai ALCAZAR 2023) मध्ये आता नवीन फ्रंट ग्रिल डिझाइन आणि पुडल लॅम्प लोगो बसवण्यात आला आहे.

७. Hyundai ALCAZAR 2023 ला आता ISG (Idle Stop and Go) तसेच साइड एअरबॅग्ज आणि पडदा एअरबॅग्ज सर्व ट्रिम्समध्ये स्टॉक फिटमेंट म्हणून ऑफर केल्या जातील, अशा प्रकारे एकूण ६-एअरबॅग्ज मानक म्हणून ऑफर केल्या जातील.

(हे ही वाचा : मार्च महिन्यात भारतात धुमाकूळ घालायला येतायत ‘या’ नवीन बाईक्स, पाहा तुमच्यासाठी कोणती असेल बेस्ट )

८. नवीन Hyundai Alcazar मध्ये १०.२५-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जिंग, क्रूझ कंट्रोल, व्हॉईस कंट्रोल्ड पॅनोरमिक सनरूफ सारखी वैशिष्ट्ये आहेत.

९. नवीन Hyundai Alcazar SUV च्या किंमती याप्रमाणे आहेत, 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह 1.5 l Turbo GDi पेट्रोल ७ सीटर प्रकार, १६,७४,९०० रुपये (Prestige) आणि १८,६५,१०० रुपये (Platinum) एक्स-शोरूम आहे.

१०. 7 DCT ट्रान्समिशनसह 1.5 l Turbo GDi पेट्रोल ६ सीटर व्हेरियंटची सुरुवातीची किंमत १९,९६,००० रुपये (Platinum (O)), आणि रुपये २०,२५,१०० (Signature (O)) एक्स-शोरूम आहे.