2023 Hyundai Aura Facelift Launched: देशातील दुसरी आघाडीची कार उत्पादक कंपनी Hyundai Motor India ने ने आपली सब-कॉम्पॅक्ट सेडान कार ‘Hyundai Aura फेसलिफ्ट मॉडेल’ अनेक अपडेट्ससह लाँच केली आहे. ज्यामध्ये फीचर्ससह त्याच्या इंजिन आणि डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. कंपनीने याआधीच अधिकृतरीत्या या कारचे बुकिंगही सुरू केले आहे. लवकरच या कारचे वितरणही सुरु होईल, असे कंपनीने सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Hyundai Aura मध्ये ‘असे’ करण्यात आले बदल

Hyundai च्या या अपडेटेड सेडानमध्ये ऑटो हेडलॅम्प, नवीन १५-इंच अलॉय व्हील, नवीन फ्रंट बंपर, ब्लॅक रेडिएटर ग्रिल, नवीन DRLs आहेत. त्यामुळे त्याचा लूक आधीच आकर्षक दिसत आहे. कंपनी सहा रंगांच्या पर्यायांसह ही कार सादर करणार आहे. ज्यामध्ये स्टाररी नाईट हा नवीन रंग म्हणून समाविष्ट केला जाईल.

(Photo-financialexpress)

(हे ही वाचा : Hyundai ची जबरदस्त फीचर्सने भरलेली नवी कोरी कार ८० हजारात खरेदी करा, महिन्याला भरा ‘इतका’ EMI )

Hyundai Aura वैशिष्ट्ये

आतील वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, Hyundai ने त्यात अनेक वैशिष्ट्यांमध्ये बदल केले आहेत. सेडानमध्ये नवीन ३.५-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्टसह ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जिंग, USB-C प्रकारचा चार्जिंग पोर्ट मिळेल. त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी त्यात चार एअरबॅग देण्यात येणार आहेत. याशिवाय दोन एअरबॅग स्वतंत्रपणे बसवण्याचाही पर्याय असेल. यासोबतच या कारमध्ये बर्गलर अलार्म, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, हिल असिस्ट कंट्रोल (एचएसी) आणि क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.

(Photo-financialexpress)

इंजिन आणि पॉवर

Hyundai Aura 2023 sedan कारला १.२-L Kappa पेट्रोल इंजिन मिळेल. जे ५-स्पीड मॅन्युअल (MT) किंवा स्वयंचलित (AMT) ट्रान्समिशनशी जोडले जाईल. हे इंजिन ८३ PS ची कमाल पॉवर आणि ११३.८ Nm चा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. कारला CNG किटचा पर्याय देखील मिळेल, जो जास्तीत जास्त ६९ PS पॉवर आणि ९५.२ NM पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. ह्युंदाईची ही कार मारुतीच्या सेडान कार डिझायरशी स्पर्धा करेल.

(हे ही वाचा : तगड्या फीचर्सनी भरलेल्या Maruti च्या कारची देशात धूम; ७ दिवसांतच मिळालं ५,००० हून अधिक बुकिंग )

Hyundai Aura किंमत

Hyundai Motor India ने देशात फेसलिफ्टेड Aura लाँच केली असून नवीन 2023 Hyundai Aura फेसलिफ्टची एक्स-शोरूम किंमत ६.३० लाख ते ८.८७ लाख रुपये आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2023 hyundai aura facelift has been launched in india at a starting price of rs 6 30 lakh ex showroom pdb