कावासकीने भारतात आपली नवीन मोटरसायकल ‘२०२३ कावासकी निंजा ZX-10R’ सादर केली आहे. लाइम हिरवा आणि पर्ल रोबोटिक पांढऱ्या रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या या मोटरसायकलची किंमत १५.९९ लाख (एक्स शोरूम) अशी आहे. हे नवीन मोटरसायकल स्पोर्टिंग बॉडी ग्राफिक्ससह बाजारात आणली गेली आहे.
Honda CBR1000RR-R, BMW S1000RR, Hayabusa आणि Yamaha YJF R1 यांसारख्या मोटरसायकलला टक्कर देणारी ही कावासकीची नवीन मोटरसायकल ठरणार आहे. कावासकीने ‘२०२१ कावासकी निंजा ZX-10R’ मोटरसायकल गेल्या वर्षी मार्चमध्ये १४.९९ लाख रुपयांच्या किंमतीसह सादर केली होती. कंपनी या महिन्यात ‘W175 रेट्रो’ मोटरसायकल’ देखील सादर करू शकते.
आणखी वाचा : Tata Tiago XE CNG 26 किमीचा मायलेज देते, खरेदी करण्यासाठी सोपा फायनान्स प्लॅन जाणून घ्या
नवीन मोटरसायकलचा राइडिंग रेंज २५५ किमी
२०७ किलो वजनाच्या या पेट्रोल नवीन मोटरसायकलमध्ये १७ लिटरची इंधन टाकी आहे. नवीन मोटरसायकलची राइडिंग रेंज १५ किलोमीटर प्रति लिटरच्या मायलेजसह २५५ किमी आहे. याचा उच्च गती ३०२ किमी प्रतितास असेल. ते ३ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवेल. त्याच वेळी, ५.२३ सेकंदात ० ते १०० एमपीएचच्या वेगाला स्पर्श करण्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
चार इंटिग्रेटेड राइडिंग मोड पर्याय
स्पोर्ट, रोड, रेन (पाऊस) आणि रायडर (मॅन्युअल) असे चार एकात्मिक रायडिंग मोड मोटरसायकलला असणार आहे. डिजिटल इग्निशन, ६-स्पीड, इलेक्ट्रिक स्टार्टसह रिटर्न ट्रान्समिशन सिस्टम बाईक रायडरला स्पोर्टी फील देईल. इंटिग्रेटेड विंगलेट आणि नवीन एअर कूल्ड ऑइल कूलर उपलब्ध असेल. ४-स्ट्रोक इन-लाइन ४ इंजिन चांगले संतुलन प्रदान करेल. तसेच, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि उच्च-कार्यक्षमता ब्रेम्बो ब्रेक सिस्टम उपलब्ध असेल. एरोडायनामिक राइडिंग पोझिशनसह इलेक्ट्रॉनिक क्रूझ कंट्रोल देखील उपलब्ध असेल.