2023 Kia Seltos Vs Hyundai Creta: किआ या कार उत्पादक कंपनीने नुकतीच आपली सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही सेलटॉसचे अपडेटेड एडिशन भारतात लॉन्च केले आहे. कंपनीने २०२३ किआ सेलटॉस फेसलिफ्ट हे मॉडेल लॉन्च केले आहे. कंपनीने या नवीन फेसलिफ्टमध्ये अनेक नवीन अपडेट्स दिले आहेत. यात आधीपासून अनेक फीचर्स होते मात्र अजून काही नवीन फीचर्स यामध्येदेण्यात आले आहेत. यामुळे ही एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाच्या तुलनेत एक जास्त चांगला पर्याय म्हणून समोर आली आहे. आज आपण 2023 Kia Seltos ला Hyundai Creta पेक्षा वेगळे करणारी ६ फीचर्स पाहणार आहोत.
सिक्वेंशियल टर्न इंडिकेटर (sequential turn indicator)
२०२३ किआ सेलटॉसच्या हेडलॅम्प क्लस्टरमध्ये ग्राहकांना sequential एलईडी टर्न इंडिकेटर मिळतात. जे क्रेटामध्ये मुळात नाहीत. हे फीचर्स सेलटॉस या फीचर्सला अधिक आकर्षक करतात. याबाबतचे वृत्त FInancial Express ने दिले आहे.
ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल
लेटेस्ट सेलटॉस फेसलिफ्टमध्ये ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल हे फिचर मिळते. तर ह्युंदाई क्रेटा सिंगल-झोन युनिटसह येते.हेच कारण आहे की Kia Seltos ला Creta च्या तुलनेत अधिक कार्यक्षम कूलिंग मिळते.
८ इंचाचा हेड अप डिस्प्ले
२०२३ Kia Seltos फेसलिफ्टमध्ये ८ इंचाचा हेड अप डिस्प्ले ग्राहकांना मिळणार आहे. तसेच हा डिस्प्ले ड्रायव्हरला आवश्यक माहिती देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. हे फिचर अद्याप ह्युंदाई क्रेटामध्ये देण्यात आलेले नाही.
ADAS
नवीनतम Kia Seltos फेसलिफ्टमध्ये १७ सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत. ज्यात फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, लेन डिपार्चर, लेन कीप असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन याचा समावेश होतो. यासह त्यात लेव्हल 2 ADAS देखील देण्यात आले आहे.
१८ इंचाचे अलॉय व्हील्स
नवीन २०२३ किया सेलटॉस फेसलिफ्टमध्ये १८ इंचाचे अलॉय व्हील्स मिळतात. तर ह्युंदाई क्रेटामध्ये १७ इंचाचे अलॉय व्हील्स ग्राहकांना मिळतात. मोठ्या आकाराच्या अलॉय व्हील्समुळे सेलटॉसच्या रायडींग क्वालिटीवर खूप परिणाम होईल.
हेही वाचा : उत्कंठा शिगेला! ‘मारुती’ची नवी इलेक्ट्रिक कार ‘या’ दिवशी येणार! टाटा, महिंद्राला मिळेल जोरदार टक्कर
१.५ लिटरचे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन
नवीन किया सेलटॉस फेसलिफ्टमध्ये शक्तिशाली इंजिन मिळते. १.५ लिटरचे GDI टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन यामध्ये देण्यात आले आहे. जे १५८ बीएचपी पॉवर आणि २५३ एनएम टॉर्क जनरेट करते. ह्युंदाई क्रेटामध्ये टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनचा पर्यय मिळत नाही. या वर्षाच्या शेवटी बाजारात येणाऱ्या ह्युंदाई क्रेटामध्ये १.५ लिटरच्या टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनच्या पर्यायसह लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे.