2023 Kia Seltos Facelift Launch: कोरियन ऑटो मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Kia ची सर्वाधिक विक्री होणारी कार, Seltos Facelift चे अनावरण करण्यात आले आहे. कंपनीच्या विक्री आणि विपणन प्रमुखाने माहिती दिली की, नवीन सेल्टोस फेसलिफ्टमध्ये ADAS फीचर मिळणार आहे. या नवीन कारमध्ये १.५ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे. ही कार ३ पॉवरट्रेन आणि ५ ट्रान्समिशनसह लाँच करण्यात आली आहे. याशिवाय, या नवीन सेल्टोस फेसलिफ्टमध्ये ३२ सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, त्यापैकी १७ ADAS वैशिष्ट्ये आहेत तर १५ सुरक्षा वैशिष्ट्ये अशी आहेत.
तीन पॉवरट्रेन आणि पाच ट्रान्समिशन पर्याय
2023 Kia Seltos फेसलिफ्टला नवीन १.५-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते, जे जास्तीत जास्त १६० PS पॉवर आणि २५३ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन नवीन सेल्टोसला सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली एसयूव्ही बनवते. यात AT, DCT, IVT, iMT आणि MT सारखे ट्रान्समिशन पर्याय मिळतात. त्यात आणखी दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. Kia Motors ने अद्ययावत सेल्टोस अशा वैशिष्ट्यांसह सादर केले आहे की ते आगामी काळात Hyundai Creta तसेच Grand Vitara, Skoda Kushaq, MG Aster आणि Toyota Urban Cruiser Hyrider साठी मोठी समस्या निर्माण करू शकतात.
(हे ही वाचा : मारुती, महिंद्रा समोर तगडं आव्हान, टाटा देशात आणतेय ADAS फीचर्ससह आपल्या दोन SUV कार)
2023 Kia Seltos Facelift सुरक्षा
2023 सेल्टोस 8 सिंगल टोन, 2 ड्युअल टोन आणि अनन्य मॅट ग्रेफाइट कलर पर्यायामध्ये ऑफर केले आहे. २०२३ सेल्टोसच्या सुरक्षिततेच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या SUV मध्ये तुम्हाला ADAS लेव्हल २ तंत्रज्ञान मिळते ज्यामध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन आणि बरेच काही समाविष्ट आहे. याशिवाय 6 एअरबॅग्स उपलब्ध असून, रिव्हर्स कॅमेरा आणि पार्किंग सेन्सर्सही कायम ठेवण्यात आले आहेत.
किंमत
2023 Kia Seltos Facelift साठी बुकिंग १४ जुलैपासून सुरु होईल. नवीन Kia Seltos ची किंमत ११ लाख रुपये असू शकते.