Kia Seltos receives 13,424 pre-orders in just one day: कार उत्पादक Kia India ने अलीकडेच त्यांच्या Seltos SUV ची फेसलिफ्ट कार सादर केली, ज्यासाठी १४ जुलैपासून बुकिंग सुरू झाली. Kia Seltos च्या फेसलिफ्टेड व्हर्जनला बुकिंग सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी विक्रमी बुकिंग मिळाले आहे. पहिल्या दिवशी, किआला सेल्टोससाठी १३,४२४ प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत. त्यापैकी १,९७३ कारचे के-कोडद्वारे बुकिंग करण्यात आले आहे. किया इंडियाने शनिवारी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Kia India ने एका निवेदनात म्हटले आहे की, “यापैकी (१३,४२४ बुकिंग), १,९७३ बुकिंग K-code द्वारे करण्यात आल्या आहेत. विद्यमान सेल्टोस ग्राहकांना उच्च-प्राधान्य पुरवठ्यासाठी हा एक विशेष कार्यक्रम आहे.

(हे ही वाचा : भारतीय लोकं ‘या’ कारवर झालेत फिदा; ४६ महिन्यांत विकल्या १० लाख कार्स, शोरुम्समध्ये होतेय गर्दी )

तुम्हाला Kia Seltos Facelift विकत घ्यायची असेल, तर तुम्ही आजच ही कार २५,००० रुपयांच्या टोकन मनीसह बुक करू शकता. मात्र, कंपनीने या कारची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. 

कारमध्ये कंपनीने ३६० डिग्री कॅमेरा, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरमिक सनरूफ, ८ इंच हेड्स अप डिस्प्ले, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक यासह अनेक फीचर्स दिले आहेत. याशिवाय सुरक्षेच्या बाबतीत, या कारमध्ये १७ ADAS वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत, ESC आणि हिल असिस्ट कंट्रोल देखील उपलब्ध आहेत.