किआ या कार उत्पादक कंपनीने नुकतीच आपली सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही सेलटॉसचे अपडेटेड एडिशन भारतात सादर केले आहे. कंपनीने २०२३ किआ सेलटॉस फेसलिफ्ट हे मॉडेल लाँच केले आहे. Kia Seltos पहिल्यांदा २०१९ मध्ये भारतीय बाजारात लाँच करण्यात आली होती. यानंतर एसयूव्हीला अपडेट मिळाले आणि अलीकडेच त्याचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच झाले.
२०२३ Kia Seltos कशी आहे खास?
२०२३ Kia Seltos फेसलिफ्टला नवीन १.५-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते, जे जास्तीत जास्त १६० PS पॉवर आणि २५३ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन नवीन सेल्टोसला सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली एसयूव्ही बनवते. यात AT, DCT, IVT, iMT आणि MT सारखे ट्रान्समिशन पर्याय मिळतात. त्यात आणखी दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत.
(हे ही वाचा:मारुतीच्या स्वस्त सात सीटर कारवर संपूर्ण देश फिदा; झाली दणादण विक्री, Innova, Carens ला ही मागे टाकलं)
२०२३ किआ सेलटॉस फेसलिफ्टमध्ये ६ एअरबॅग्स मिळणार आहेत. त्याच्या लेव्हल-२ ADAS मध्ये १७ सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. जर आपण सुरक्षिततेबद्दल बोललो तर त्यात १५ सुरक्षा वैशिष्ट्ये मानक आहेत. अशाप्रकारे, SUV ला एकूण ३२ सुरक्षा वैशिष्ट्ये मिळतात, जी प्रकारावर अवलंबून आहेत. ही कार ३ पॉवरट्रेन आणि ५ ट्रान्समिशनसह लॉन्च करण्यात आली आहे. 2023 Kia Seltos फेसलिफ्टला नवीन १.५-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते, जे जास्तीत जास्त १६० PS पॉवर आणि २५३ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन नवीन सेल्टोसला सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली एसयूव्ही बनवते.
किंमत
किआ सेलटॉस फेसलिफ्ट Hyundai Creta तसेच Grand Vitara, Skoda Kushaq, MG Aster आणि Toyota Urban Cruiser Hyrider यांच्याशी स्पर्धा करेल. Kia Seltos फेसलिफ्ट व्हर्जनची किंमत १०.९० लाख ते २० लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.