गेल्या काही वर्षांपासून भारतात सीएनजीवर चालणाऱ्या कारची मागणी वाढली आहे. सीएनजीवर चालणाऱ्या कारच्या विक्रीत झालेली वाढ पाहता आता सीएनजीवर चालणाऱ्या एसयूव्हीही बाजारात येत आहेत. आता कार कंपन्यांनी निर्भयपणे हॅचबॅक आणि सेडान तसेच एसयूव्हीच्या सीएनजी आवृत्त्या लाँच करण्यास सुरुवात केली आहे. या मालिकेत आता Kia Motors आपली सब-फोर मीटर कॉम्पॅक्ट SUV Sonnet CNG अवतारात सादर करण्याच्या तयारीत आहे. Kia Sonnet CNG ची चाचणी भारतातही सुरू झाली आहे.

Kia Sonnet CNG SUV मध्ये काय असेल खास

या नवीन Kia Sonnet CNG SUV मध्ये, तुम्हाला फॅक्टरी फिट केलेले CNG किट तसेच १.० लिटर ३ सिलेंडर टर्बो-चार्ज केलेले पेट्रोल इंजिन मिळेल. ही SUV ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह लाँच केली जाईल. अहवालांवर विश्वास ठेवला तर या Sonnet सीएनजीचे मायलेज २५ ते ३० किमी/किलो असण्याची शक्यता आहे.

Budget 2025 Prices of Electric vehicles to get cheaper
Budget 2025 : इलेक्ट्रिक वाहनांबाबत निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा! अर्थसंकल्पातील निर्णयामुळे सर्वसामान्यांना मिळणार ‘हे’ फायदे
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Car blast protection avoid putting these things in your car boot trunk car safety tips
चक्क बॉम्बसारखी फुटेल कारची डिकी; गाडीत ‘या’ गोष्टी ठेवत असाल, तर सावधान! एक छोटीशी चूक पडेल महागात
Accident video viral where Speedy Bus hit the man shocking video on social media
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; बसने दिली धडक, टायरखाली येणार इतक्यात…, पुढच्याच क्षणी काय झालं पाहा
Convert old car into new upgrade your car by using these tips
वर्षानुवर्षे एकच गाडी वापरून तुम्हाला कंटाळा आला आहे का? मग अगदी स्वस्तात बनवा तुमची कार नवीकोरी, जाणून घ्या ‘या’ टिप्स
Kia Syros SUV price features
KIA च्या ‘या’ कारची लाँच आधीच बुकिंग सुरू; नेमकी इतकी मागणी का? फीचर्स काय आहेत, जाणून घ्या
What is best time to change car engine oil for maximum performance
कार घेतलीय पण ‘ही’ गोष्ट अजूनही माहित नाही! जाणून घ्या, गाडीचे ‘इंजिन ऑइल’ किती दिवसांनी बदलावे…
analysing psychology of Spread Rumours by People
अफवा : एक खेळ

(हे ही वाचा: ‘ही’ ७ सीटर कार खरेदीसाठी ग्राहकांची शोरूम्सवर गर्दी, वेटिंग पीरियड वाढला, कंपनीला थांबवावे लागले बुकिंग!)

(हे ही वाचा : )

kia Sonnet CNG मारुती सुझुकी Brezza CNG तसेच आगामी Tata Nexon CNG आणि Hyundai Xtor CNG शी स्पर्धा करेल. आगामी काळात सेल्टोस आणि केरेन्सचे सीएनजी व्हर्जनही बाजारात आणले जाऊ शकतात, अशीही माहिती मिळत आहे.

किंमत

दुसरीकडे, जर आपण लूक आणि वैशिष्ट्यांबद्दल बोललो तर, सॉनेट सीएनजी त्याच्या पेट्रोल आणि डिझेल प्रकारांसारखे असू शकते. दुसरीकडे, जर आपण या SUV च्या किंमतीबद्दल बोललो तर, या Kia Sonnet CNG SUV ची किंमत त्याच्या पेट्रोल वेरिएंटपेक्षा एक लाख रुपयांपर्यंत महाग असू शकते.

Story img Loader