Auto Expo 2023: महिंद्राने त्यांचे प्रसिद्ध थार (Thar 4X2) या नवीन वर्षात लॉन्च केले आहे. कंपनीने SUV सेगमेंटमध्ये सादर केलेल्या नवीन थार 4X2 ला अधिक चांगला लुक दिला आहे. महिंद्राने देशात नवीनतम थार (२०२३ महिंद्रा थार ४एक्स२) सादर केले आहे. कंपनीने आपला नवीन Mahindra Thar 4X2 SUV सेगमेंटमध्ये तीन प्रकारांमध्ये उपलब्ध करून दिला आहे. नवीनतम महिंद्रा थार पेट्रोल ऑटोमॅटिक आणि डिझेल मॅन्युअल पॉवरट्रेन प्रकारांसह सादर करण्यात आली आहे.
2023 महिंद्रा थार: इंजिन आणि गिअरबॉक्स
नवीनतम महिंद्रा थार 4X2 (RWD) मध्ये १.५ लिटर क्षमतेचे नवीन डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ११७ bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. या इंजिनसोबत ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. यात २.० लीटर टर्बो पेट्रोल मोटर देखील मिळते. ६ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर AT मोटरला जोडलेले आहे. महिंद्राच्या थार 4X4 प्रकारात २.२ लिटर क्षमतेचा ऑइल बर्नर आणि २.० लिटर टर्बो पेट्रोल मोटर आहे. तसेच, कंपनीच्या थार 4X4 प्रकारात ६ स्पीड एमटी आणि ६ स्पीड एटी जोडण्यात आले आहेत.
(हे ही वाचा : Auto Expo 2023: यंदाच्या ऑटो एक्स्पोत काय खास असणार? जाणून घ्या तिकिटासह सर्व माहिती)
(हे ही वाचा : Mahindra च्या ‘या’ तीन कारने ग्राहकांना लावले वेड! झाली छप्परफाड विक्री )
2023 महिंद्रा थार किमती
Mahindra Thar 4X2 SUV सेगमेंटमध्ये तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. या सर्व प्रकारांच्या किमती (एक्स-शोरूम) ९.९९ लाख रुपयांपासून ते १३.४९ लाख रुपयांपर्यंत सुरू आहेत. ग्राहकांसाठी एक खास गोष्ट आहे. महिंद्राच्या नवीन थार एसयूव्हीच्या या एक्स-शोरूम किमती फक्त पहिल्या १०,००० बुकिंगसाठी लागू आहेत. या नव्या एसयूव्हीचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे. नवीन महिंद्राच्या नवीनतम थार 4X2 ची डिलिव्हरी या आठवड्यात १४ जानेवारी २०२३ पासून सुरू होईल.