MG मोटार इंडिया देशातील एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी अनेक कार्स लॉन्च केल्या आहेत. आता एमजी मोटर इंडिया आपल्या SUV Astor चे अपडेटेड एडिशन 2023 Astor लॉन्च करणार आहे. ज्याचा टिझर कंपनीने सादर केला आहे. अपडेटेड 2023 Astor मध्ये नवीन फीचर्स आणि नवीन पेंट स्कीमसह डिझाईन अपडेट मिळण्याची शक्यता आहे. या नवीन अपडेटेड एसयूव्हीमध्ये ग्राहकांना काय काय नवीन मिळणार आहे ते पाहुयात.
2023 Astor मध्ये सध्याच्या एसयूव्हीमध्ये असलेल्या १० इंचाच्या टचस्क्रीन ऐवजी हेक्टर फेसलिफ्टप्रमाणे नवीन १४ इंचाचा व्हर्टिकल इंफोटेन्मेन्ट सिस्टीम मिळण्याची शक्यता आहे. नवीन Aster ला अपडेटेड ७ इंचाचा ऑल डिजिटल कन्सोल आणि अपडेटेड ऑपरेटिंग सिस्टीम मिळण्याची अपेक्षा आहे. एमजीने २०२३ हेक्टरमध्ये व्हॉइस कमांडसह ८-रंगाची अॅम्बिएन्ट लाइटिंग दिले आहे. जे आगामी Astor मध्ये देखील दिले जाऊ शकते. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.
MG Astor ही लेव्हल २ ADAS सिस्टीम आणि AI असिस्टंट ऑफर करणारी त्याच्या सेगमेंटमधील पहिली एसयूव्ही आहे. यामध्ये या एसयूव्हीला १०० पेक्षा जास्त व्हॉइस कमांड्स समजतात. ज्यामध्ये ३५ हिंग्लिशचा समावेश आहे. या एसयूव्हीमध्ये नॉर्मल, अर्बन आणि डायनॅमिक असे तीन स्टिअरिंग मोड येतात.तसेच डिजिटल कार-की, कनेक्टड टेलिमॅटिक्स हीटेड ORVM आणि चौदा ADAS पर्याय अशा फीचर्ससह Aster सेगमेंटमध्ये अधिक फीचर्स असलेली एसयूव्ही आहे.
इंजिन स्पेसिफिकेशन्स
Astor मध्ये दोन पेट्रोल इंजिनचा पर्याय उपलब्ध असेल. त्यामध्ये पहिले हे १.५ लिटरचे एस्पिरेटेड आणि दुसरे म्हणजे १.३ लिटरचे टर्बो इंजिन. पहिले इंजिन १०८ बीएचपी पॉवरट्रेन आणि १४४ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल किंवा CVT शी जोडण्यात आलेले आहे. तर दुसरीकडे टर्बो पेट्रोल इंजिन हे १३८ बीएचपी आणि २२० एनएम ट्रॅक जनरेट करते. हे इंजिन केवळ ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.
नवीन Astor ह्युंदाई क्रेटा, मारुती सुझुकी Grand Vitara, किया Seltos, स्कोडा Kushaq, टोयोटा Urban Cruiser Hyryder आणि फॉक्सवॅगन Taigun या कार्सशी स्पर्धा करेल. तर होंडा Elevate आणि Citroen C3 Aircross देखील लवकरच लॉन्च होणार असल्याने स्पर्धा आणखी तीव्र होऊ शकते.