2023 Tata Harrier, Safari Launched With ADAS, New Features: सध्याच्या काळात कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवीन टेक्नोलॉजीचा वापर करुन सेफ्टी फीचर्स वापरण्यात येत आहेत. तंत्रज्ञानाच्या वाढीमुळे गाड्या अधिक प्रगत बनवण्याचे काम सुरू झाले आहे. यासोबतच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यात लोकांसाठी अनेक खास वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. त्याचबरोबर सर्वच कंपन्यांनी ग्राहकांच्या सुरक्षेची चांगली काळजी घेण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे टाटा मोटर्सच्या कारची सुरक्षिततेच्या बाबतीत वेगळी ओळख आहे. माहितीनुसार, टाटा मोटर्सने आपल्या कार हॅरियर आणि सफारीमध्ये Advanced Driver Assistance System (ADAS) जोडले आहे, पण ADAS तंत्रज्ञान नेमकं कसं काम करतं ते जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे ADAS System?

ADAS हे एक विशेष प्रकारचे सुरक्षा वैशिष्ट्य आहे, जे अपघात टाळण्यास मदत करते. तर ADAS मध्ये डोर ओपन अलर्ट, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, फॉरवर्ड टक्कर चेतावणी यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. अ‍ॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम (Advanced Driver Assistance Systems) एक टॉप क्लास मेकॅनिज्म आहे. हे तुम्हाला ऑटोमेटिक कारचं फिलिंग देतं. हे कोणत्याही जर्मन किंवा अमेरिकन गाडीत नाही तर भारतात बनलेल्या गाड्यांमध्ये सुद्धा पहायला मिळतं. अ‍ॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टम (Advanced Driver Assistance Systems) खूपच खास सेफ्टी फीचर आहे जे तुम्हाला सरक्षित ठेवण्यासाठी खूप मदत करतं. तुमच्या गाडीच्या समोर असलेल्या गाडीत आणि तुमच्या गाडीत एकसमान अंतर ठेवण्यासाठी या टेक्नोलॉजीचा मोठा फायदा होतो. हे ADAS कसे काम करते, जाणून घेऊया…

ADAS कसे काम करते?

ADAS मध्ये समाविष्ट असलेल्या फॉरवर्ड टक्कर चेतावणीमध्ये सेन्सर्स असतात जे कारच्या आजूबाजूला धोका असतो तेव्हा स्वयंचलितपणे सूचित करतात. यासोबतच तुम्हाला याद्वारे हे देखील कळते की, कोणत्या कारची तुमच्याशी टक्कर होण्याची शक्यता आहे, कारण ते कोणत्याही वाहनाजवळ येताना संभाव्य धोक्याची सूचना देते. यासोबतच यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग (AEB) देखील अप्रतिम आहे, जे कार सुरू होताच तुमच्या कारच्या सिस्टीममधील बिघाड सांगते.

ADAS अपघातांना प्रतिबंध करते

ADAS मध्ये समाविष्ट हाय बीम असिस्ट (HBA) तुम्हाला हायवेच्या अंधारात खूप मदत करते, कारण हे फीचर विरुद्ध दिशेने येणारे वाहन दिसल्यावर कमी बीमवर आपोआप स्विच करते, जेणेकरून चालकाला त्रास होणार नाही. यासोबतच ट्रॅफिक साइन रेकग्निशन (टीएसआर), लेन डिपार्चर वॉर्निंग इत्यादींचाही समावेश अपघातांना मोठ्या प्रमाणात आळा घालतो.