2023 TATA TIGOR EV : बाजारात ईव्ही वाहानांना मोठी मागणी आहे. ही मागणी पुरवण्यासाठी इलेक्ट्रिक कंपन्या देखील सज्ज आहेत. अलीकडेच पीएमव्हीने देशातील सर्वात छोटी इेलक्ट्रिक कार परवडणाऱ्या दरात सादर केली आहे. तर, प्रवेग ही कंपनी देखील आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही २५ नोव्हेंबरला लाँच करणार आहे. अशात टाटा मोटर्सने आपली अपडेटेड टिगोर ईव्ही बाजारात लाँच केली आहे. २०२३ टाटा टिगोर ईव्ही चार व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही सिडान कार ३१५ किमीची रेंज देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
काय आहे किंमत?
Tata tigor xe ची किंमत १२.४९ लाख, tata tigor xt ची किंमत १२. ९९ लाख, tata tigor xz+ ची किंमत १.४९ लाख आणि tata tigor xz + lux ची किंमत १३.७५ लाख रुपये आहे. या सर्व एक्स शोरूम किंमती आहेत.
(गर्दीतही सापडेल ‘हा’ स्कुटर, २४० किमी रेंज, जाणून घ्या किंमत)
रेंज आणि फीचर्स
नवीन tata tigor ev मध्ये २६ किलोवॉट हवर लिक्विड कुल्ड आयपी – ६७ रेटेड बॅटरी पॅक देण्यात आले आहे, जे एक इलेक्ट्रिक मोटरशी जोडण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक मोटर ७४ बीएचपीची शक्ती आणि १७० एनएमचा टॉर्क निर्माण करते. कार प्रत्येक चार्जवर ३१५ किमीची रेंज देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पूर्वीच्या तुलनेत कार ९ किमी अधिक चालणार आहे.
फीचरच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, कारमध्ये मल्टी मोड रेजेन, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, टीपीएमएस, टायर पंक्चर रिपेअर कीट आणि आणखी काही फीचर्स देण्यात आले आहेत.