Honda मोटारसायकल आणि स्कूटर इंडिया ही देशातील दुचाकी उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीने आपली नवीन मोटरसायकल भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने होंडा Unicorn १६० भारतात लॉन्च केली आहे. ही एक अपडेटेड मोटरसायकल आहे. यामध्ये अपडेटेड असे OBD2 इंजिन आहे आणि त्यामध्ये १० वर्षांची वॉरंटी मिळते. या मोटारसायकलची किंमत आणि फीचर्स याबद्दल जाणून घेऊयात.
डिझाईन आणि फीचर्स
होंडा युनिकॉर्न एक प्रीमियम १६० सीसी असणारी कॉम्पुटर मोटारसायकल आहे. ज्यामध्ये क्रोम एम्बेलिशमेंट (embellishments)सह हेडलॅम्प, मस्क्युलर फ्युएल टॅंक, लांब अशी सीट आणि ब्लॅक आऊट अलॉय व्हील देण्यात आले आहेत. युनिकॉर्न १६० पर्ल Igneous ब्लॅक, इम्पिरिअल रेड मेटॅलिक, मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक आणि पर्ल Siren ब्लू या चार रंगांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.
इंजिन आणि गिअरबॉक्स
२०२३ होंडा युनिकॉर्न १६० या अपडेटेड मोटारसायकलमध्ये सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड असे १६२.७ सीसीचे इंजेक्टेड इंजिन आहे. जे आता OBD2 सह येते. हे इंजिन ७,५०० आरपीएमवर १२.७ बीएचपी आणि ५,५०० आरपीएमवर १४ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडण्यात आले आहे. तसेच ब्रेकिंगसाठी मोटारसायकलला समोरच्या बाजूला सिंगल चॅनेल ABS आणि मागील बाजूस ड्रम युनिटसह डिस्क ब्रेक मिळतो.
होंडा युनिक्रोन १६० लॉन्च करताना होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाचे अध्यक्ष, सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक Tsutsumu Otani म्हणाले, ”गेले २ दशके युनिकॉर्न ही भारतातील मोटारसायकलस्वारांची पसंतीची मोटारसायकल ठरली आहे. अपडेटेड युनिकॉर्नचे लॉन्चिंग हे नवनवीन नियमांचे पालन करण्याची शक्ती, कार्यक्षमता आणि आरामदायी मॉडेल्स लॉन्च करण्याच्या आमच्या विचारांना बळकट करते. आम्ही आमच्या ग्राहकांना त्याची दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.”