2024 Hero Glamour 125 launched in India: देशातील आघाडीची दुचाकी कंपनी Hero MotoCorp ने भारतीय बाजारात मोठा धमाका केलाय. आपली लोकप्रिय बाईक Glamour 125 अपडेट करून लॉन्च केली आहे. नवीन ग्लॅमरमध्ये नवीन रंग आणि नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. या बाईकची थेट स्पर्धा Honda Shine आणि TVS Raider 125 शी होईल, अशी चर्चा रंगली आहे. चला तर मग या नव्या अवतारात सादर झालेल्या Hero Glamour 125 मध्ये काय नवीन पाहायला मिळणार, जाणून घेऊया…
2024 Hero Glamour 125 काय असेल खास?
2024 Hero Glamour 125 मध्ये आता प्रगत एलईडी हेडलाइट्स आहेत. रात्री लांब दृश्यमानता असेल, असा दावा करण्यात आला आहे. तुम्हाला हे वैशिष्ट्य या सेगमेंटच्या कोणत्याही बाइकमध्ये किंवा त्याखालील सेगमेंटमध्ये दिसणार नाही. रात्रीच्या वेळी रस्त्यावर अनेकदा दिवे नसतात, त्यामुळे अशा परिस्थितीत लांब दृश्यमानता असलेला हेडलाइट खूप मदत करू शकतो.
नवीन ग्लॅमर 125 मध्ये आता एक नवीन सुरक्षा वैशिष्ट्य समाविष्ट केले आहे. कारमध्ये हे वैशिष्ट्य सर्रास दिसत असले तरी आता दुचाकी वाहनांमध्येही ते पाहायला मिळत आहे. या वैशिष्ट्याला वार्निंग लाइट देखील म्हणतात. या फीचरच्या मदतीने समोरून किंवा मागून येणाऱ्या वाहनांना अलर्ट मिळतो, इतकेच नाही तर धुके किंवा पावसातही हे फीचर खूप फायदेशीर ठरेल.
(हे ही वाचा : Gurkha-Thar सर्व विसरुन जाल! देशात आली स्वस्त १० सीटर कार, मोठ्या कुटुंबियांसाठी ठरतेय बेस्ट, किंमत… )
इंजिन आणि पॉवर
नवीन ग्लॅमरमध्ये १२५cc एअर-कूल्ड, ४-स्ट्रोक इंजिन आहे जे ८kW ची कमाल पॉवर आणि १०.६ Nm टॉर्क जनरेट करते. यात ५ स्पीड गिअरबॉक्सची सुविधा आहे. बाईकचे वजन १२३ किलो पर्यंत आहे. यात १८ इंच टायर आहेत. यात पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेकची सुविधा आहे. नवीन ग्लॅमरची लांबी २०५१ मिमी, उंची १०७४ मिमी आणि रुंदी ७२० मिमी आहे, याचा व्हीलबेस १२७३ मिमी आहे, ज्यामुळे बाईकची स्थिरता आणि नियंत्रण चांगले आहे. बाईकची चाके ही १८ इंचची आहेत.
किंमत आणि वैशिष्ट्ये
या बाईकमध्ये स्टॉप-स्टार्ट स्विच आहे, या वैशिष्ट्याच्या मदतीने इंजिन काही सेकंदांसाठी आपोआप थांबते ज्यामुळे इंधनाचा वापर कमी होऊ लागतो. कँडी ब्लेझिंग रेड, ब्लॅक स्पोर्ट्स रेड आणि ब्लॅक टेक्नो ब्लू व्यतिरिक्त, या बाइकमध्ये नवीन ब्लॅक मेटॅलिक सिल्व्हर कलर पर्याय देखील आहे. 2024 ग्लॅमर 125 दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या ड्रम व्हेरिएंटची किंमत ८३,५९८ रुपये आहे, तर डिस्क व्हेरिएंटची किंमत ८७,५९८ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.