2025 Honda SP 160 launched In India : होंडाने भारतात ‘होंडा २०२५ एसपी १६०’ (2025 Honda SP 160) ची अपडेटेड इंटरेशन (iteration) लाँच केली आहे, ज्याची सुरुवातीची किंमत १,२१,९५१ रुपये आहे. स्पोर्टी कम्युटर मोटरसायकल सिंगल डिस्क आणि ड्युअल डिस्क या दोन व्हेरिएंटमध्ये ऑफर केली जाते आहे. दोन्ही व्हेरिएंटची किंमत १,२७,९५६ रुपये (दोन्ही एक्स-शोरूम)आहेत. १६० सीसी (160cc) स्पोर्टी कम्युटर मोटरसायकल आता बेस व्हेरिएंटपेक्षा ३,००० रुपये अधिक महाग आणि टॉप-स्पेक ट्रिमपेक्षा ४,६०५ रुपये जास्त महाग आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२५ होंडा एसपी १६० मध्ये नवीन काय असणार आहे (2025 Honda SP 160) ?

अलीकडेच, जपानी बाईकमेकरने काही दिवसांपूर्वी एसपी १२५ (SP 125) चे अपडेट केलेले ईंटरेशन लाँच केले. सुरुवातीसाठी २०२५ एसपी १६० ला स्पोर्टी श्राउड्स (shrouds ) मस्क्यूलर इंधन टाकी मिळते, जी मोटरसायकलला मस्क्यूलर प्रोफाइल देते.

२०२५ होंडा एसपी १६० ला अँग्युलर हेडलॅम्प क्लस्टर मिळतो, ज्याला आता एलईडी इलूमिनेशन, टेललॅम्प, एक एलईडी युनिट दिले जाईल. अपडेटेड एसपी १६० (SP 160) रेडियंट रेड मेटॅलिक, पर्ल इग्नियस ब्लॅक, पर्ल डीप ग्राउंड ग्रे आणि ॲथलेटिक ब्लू मेटॅलिक आदी चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. आधीचे मॉडेल सहा शेडमध्ये उपलब्ध होते.

हेही वाचा…Urban Cruiser EV : टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक कार! सुझुकी ई विटाराची जणू धाकटी बहीण; पाहा, भारतात कधी होणार लाँच?

फीचर्सच्या बाबतीत सांगायचे झाल्यास २०२५ एसपी १६० ((2025 Honda SP 160)) ला ४.२ इंचाचा टीएफटी डिस्प्ले इन्स्ट्रुमेंट पॅनल मिळतो जो कॉल, एसएमएस अलर्टसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देतो. इतर फीचर्समध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट, होंडा रोडसिंक ॲपचा समावेश आहे, जे स्मार्टफोनला इन्स्ट्रुमेंट पॅनेलमध्ये एकत्रीकरण करण्यास अनुमती देते. रिअल-टाइम टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि म्युजिक प्लेबॅकसारखी फीचर्स ऑफर करतात.

एसपी १२५ प्रमाणे, एसपी १६० (SP 160) त्याच इंजिनसह चालू आहे, पण ते आता ओबीडी २ बी (OBD2B) चे आगामी सरकारी नियमांचे पालन करण्यासाठी अनुरूप आहे. हे त्याच १६२.७१ सीसी (162.71cc) सिंगल-सिलेंडर इंजिन 13 bhp आणि 14.8 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही मोटर ५ स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2025 honda sp 160 has launched in india motorcycle is offered in two variants checkout price asp