Affordable Two-Wheelers with ABS : अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) ही एक महत्त्वाची सुरक्षा सुविधा आहे जे अचानक ब्रेक लावताना धोका कमी करते ज्यामुळे ड्रायव्हरला गाडीवर अधिक नियंत्रण ठेवण्यास मदत करते. दुचाकीची सुरक्षितता जपण्यासाठी एबीएस आवश्यक आहे. जर तुम्हाला एबीएस सुरक्षा फीचरसह कमी बजेटमध्ये असलेल्या दुचाकी खरेदी करायच्या आहेत का? आज आपण १.२० लाखांपेक्षा कमीत कमी किमतीच्या पाच दुचाकी जाणून घेणार आहोत.

बजाज पल्सर 150 (Bajaj Pulsar 150)

बजाज पल्सर 150 ही भारतातील सर्वात लोकप्रिय दुचाकींपैकी एक आहे आणि वीस वर्षांहून अधिक काळानंतरही बजाज पल्सरच्या विक्रीचा आकडा कमी झालेला नाही. १.१० लाखाच्या एक्स-शोरूम किंमतीसह तुम्ही ही दुचाकी खरेदी करू शकता. यात ABS ची सुविधा आणि नवीन पल्सरमध्ये NS आणि N व्हेरिअंट असून मुळात पल्सर आपला रुबाब टिकवून आहे.

हिरो एक्सट्रीम 160 आर 2 व्ही (Hero Xtreme 160R 2V)

हिरो एक्सट्रीम 160 आर 2 व्ही, ज्याची किंमत १.११ लाख (एक्स-शोरूम) आहे, ही एक उत्तम दुचाकी आहे. हलकी, वेगाने पळणारी आणि परवडणारी दुचाकी म्हणून ओळखली जाणारी, Hero Xtreme 160R 2V मध्ये एबीएस सुविधा आहे. यात ड्रॅग टाइमर, एलईडी लाइटिंग आणि ब्राइटनेससह इनव्हर्टेड एलईडी डिजिटल डिस्प्ले इत्यादी महत्त्वाचे फीचर्स आहेत.

हिरो एक्सट्रीम 125 आर (Hero Xtreme 125R)

हिरो एक्सट्रीम 125 आर ही एक स्ट्रीटफायटर आहे जी स्पोर्टी लूक प्रदान करते. 125 सीसी इंजिनने सुसज्ज असलेली ही दुचाकी ग्राहकांची पहिली पसंती आहे. हिरो एक्सट्रीम 125 आर सध्या ऑटो मार्केटमध्ये एक महत्त्वाचा स्पर्धक म्हणून उदयास आला आहे. याची किंमत ९९,५०० (एक्स-शोरूम) आहे ज्यामुळे ती भारतातील दुसरी सर्वात परवडणारी ABS-सुसज्ज दुचाकी आहे. या दुचाकीने तिच्या प्रतिस्पर्धी बजाज पल्सर NS 125 ला एकूण ७,००० ने मागे टाकले आहे.

बजाज पल्सर एनएस 125 (Bajaj Pulsar NS125)

125 सीसी कॅटेगिरीतील आणखी एक दुचाकी म्हणजे बजाज पल्सर एनएस 125 जी अलीकडेच एबीएससह मार्केटमध्ये आली आहे. १ लाख रुपयांपासून सुरू होणारी एबीएस व्हर्जनची किंमत ७,००० इतकी आहे. या मॉडेलमध्ये स्पोर्टी डिझाइन आहे आणि त्यात एलईडी हेडलाइट आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या सारख्या सुविधांचा समावेश आहे.

बजाज प्लॅटिना 110 एबीएस (Bajaj Platina 110 ABS)

शेवटी, बजाज प्लॅटिना 110 एबीएस ही या लिस्टमधील एकमेव 110 सीसी दुचाकी म्हणून ओळखली जाते आणि ती भारतातील सर्वात परवडणारी एबीएस असलेली मोटरसायकल आहे ज्याची किंमत ७१,५५८ (एक्स-शोरूम) आहे. ही बाईक शहरी आणि ग्रामीण भागात तिच्या परवडण्यायोग्य दुचाकी म्हणून आणि एकूण किमतीसाठी लोकप्रिय आहे. .