CNG Kit Installation In Car : भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती खूप जास्त आहेत आणि त्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. ज्यामुळे लोक पर्याय म्हणून हायब्रीड, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आता सीएनजीचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर आता सीएनजी पंपदेखील दिसून येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीएनजीच्या अनेक चाचण्या आणि परीक्षण केल्यानंतर ते सुरक्षित, इंधन कार्यक्षम आणि किफायतशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. जरी सीएनजी कारची किंमत मानक पेट्रोल कारपेक्षा थोडी जास्त असली, तरी अतिरिक्त खर्च साधारणपणे दोन ते तीन वर्षात वसूल केला जाऊ शकतो.

पण, तुम्ही तुमच्या पेट्रोल कारमध्ये सीएनजी किट रिट्रोफिट करून घेण्यासाठी जवळच्या अधिकृत सीएनजी डीलरकडे घेऊन जाण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे, ज्याचा तुम्हालाच फायदा होऊ शकतो.

पेट्रोल कारमध्ये सीएनजी किट बसवण्याआधी लक्षात घ्या ‘या’ ५ गोष्टी (CNG Kit In Car 5 Things To Keep In Mind Before Installing Cost)

१) सर्वच कार सीएनजी किटला सपोर्ट करत नाहीत

सीएनजी किट फक्त पेट्रोल वाहनांमध्येच बसवता येते, यामुळे सर्व कारमध्ये सीएनजी किट बनवता येत नाहीत. जुन्या वाहनांमध्ये सीएनजी किट बसवता येऊ शकत नाहीत. कार सीएनजी किट बसवण्यास योग्य असल्याची पुष्टी झाल्यानंतर तुम्हाला कारचे नोंदणी कार्ड (RC) अपडेट करावे लागते. तुम्ही स्थानिक परिवहन प्राधिकरणाला भेट देऊन ते अपडेट करून घेऊ शकता. आरसीमध्ये नमूद केलेला इंधन प्रकार बदलणे आवश्यक असते आणि त्यानंतरच कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमचे पेट्रोल वाहन सीएनजी वाहन म्हणून चालवू शकता.

२) कंपनी की आफ्टरमार्केट फिट सीएनजी किट? कोणता घेणं योग्य

फॅक्टरी-फिट केलेले सीएनजी किट अधिक महाग असतात, परंतु ते मनःशांती देतात; कारण ते OEM वॉरंटीसह येतात आणि कंपनीच्या सेवा नेटवर्कद्वारे सपोर्टेड असतात. ऑटोमोबाईल उत्पादकाकडून खरेदी केलेल्या कोणत्याही वाहनाप्रमाणे सीएनजी वाहनांनाही मोफत कॉम्प्लिमेंट्री सर्विस मिळते.

आफ्टरमार्केट सीएनजी किट अधिक परवडणारे असते आणि अधिकृत सीएनजी रेट्रो किट डीलर्सकडून उपलब्ध होतात. पण, काहीवेळा गॅस गळतीसारख्या सुरक्षिततेच्या समस्या उद्भवू शकतात. समस्या येण्याची शक्यता कमी असते, पण तरी OEM आणि डीलरकडून वॉरंटी मिळाल्याने मनःशांती मिळू शकते. सीएनजी कन्व्हर्जन किट बसवण्यासाठी ६०,००० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

More Auto Stories Read Here : बाईकमधील ‘हा’ पार्ट असतो अधिक महत्त्वाचा; खडबडीत रस्त्यांवर चालवता येते सुरक्षित बाईक

३) हायर कार इन्शुरन्स प्रीमियम

सीएनजी इंधनाची किंमत पेट्रोलपेक्षा कमी आहे, परंतु इन्शुरन्स प्रीमियम पारंपरिक इंधनापेक्षा जास्त आहे. कार सीएनजीमध्ये बदलल्यानंतर लगेच इन्शुरन्स कंपनीला कळवणे महत्त्वाचे आहे, कारण सध्याच्या पॉलिसीला कायदेशीर मान्यता मिळत नाही. आरसी (नोंदणी प्रमाणपत्र) अपडेट केल्यानंतर लगेच तुम्ही ही प्रोसेस केली पाहिजे.

४) सीएनजी दीर्घकाळासाठी फायदेशीर (CNG Kit Installation)

सीएनजी हे स्वच्छ इंधन आहे, जे पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा कमी प्रदूषकांचे उत्सर्जन करते. हे कमी कार्बन डाय ऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साईड तयार करते, जे श्वासोच्छवासाच्या समस्या आणि दम्याचा झटका यांसारख्या आरोग्य समस्या कमी करण्यास मदत करते.

हेही वाचा – नवीन कारची डिलिव्हरी घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टी तपासा; नाही तर भविष्यात होऊ शकते मोठे नुकसान

५) सीएनजीवर मिळतो कमी परफॉर्मन्स

सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या कार्यक्षम आहेत, तसेच त्याच्या इंधनाचा खर्च पेट्रोलपेक्षा खूपच कमी आहे. पण, यात एक नकारात्मक गोष्ट म्हणजे सीएनजी कारसाठी वारंवार सर्व्हिसिंगची आवश्यकता असते आणि सीएनजी टाकीमुळे बूट स्पेस कमी होते. याव्यतिरिक्त सीएनजी वाहनांची कार्यक्षमता कमी असते. पेट्रोल कारच्या तुलनेत सीएनजी कारचा परफॉर्मन्स खूपच कमी असतो.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 things to keep in mind before installing cng kit in car how do you maintain a cng fitted car sjr
Show comments