आलिशान फीचर, आणि मायलेज हे कार चाहत्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र काहींना वेगही आवडतो. वेगवान कार तुम्हाला कमी वेळात अधिक अंतर पार करण्यात मदत करते. मात्र ते धोकादायकही आहे. वेग मर्यादा ओलांडल्यास अपघात होण्याची शक्यता अधिक असते. आज आपण जगातील काही सर्वात वेगवान ६ वाहनांविषयी जाणून घेऊया. त्यांना टॉप स्पिडवर चालवण्याची कोणाचीही हिंमत होईल असे वाटत नाही. आणि धाडस हा जिवावर बेतू शकतो.
1) एसएससी टुआटारा
SSC Tuatara ही जगातील सर्वात वेगवान कारपैकी एक आहे. या कारची टॉप स्पिड ४४५ किमी प्रति तास आहे. कारमध्ये ट्विन टर्बोचार्ज्ड ५.९ लिटर इंजिन आहे, जे ७५० एचपीची कमाल शक्ती निर्माण करते.
२) अगेरा आर एस
Koenigsegg Agera RS ही जगातील देखील वेगवान कार आहे. या कारचा सर्वोच्च वेग ४४७ किमी प्रति तास आहे. कारमध्ये ५.० लिटरचे ट्विन टर्बो व्ही ८ इंजिन आहे, जे ११६० एचपीची शक्ती निर्माण करते. ही कार जगातील केवळ ११ लोकांकडे आहे.
३) हेनेसे वेनम जीटी
Hennessey Venom GT ही देखील वेगवान कारच्या यादीत येते. या कारचा सर्वोच्च वेग ४३५ किमी प्रति तास आहे. कारमध्ये ७.० लीटर व्ही ८ इंजन आहे जे १२४४ एचपीची शक्ती निर्माण करते. या कारच्या नावे ५.६ सेकंदात १६० किमी प्रति तासाचा वेग पकडल्याचा विक्रम आहे.
४) बुगाटी चिरोन
Bugatti Chiron या कारचा सर्वोच्च वेग ४२० किमी प्रति तास आहे. कारमध्ये ८.० लिटर टर्बो चार्ज्ड डब्ल्यू १६ इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन १४७९ एचपीची शक्ती निर्माण करते.
५) बुगाटी व्हेरॉन सुपर स्पोर्ट
Bugatti Veyron Super Sport या कारचा सर्वोच्च वेग ४१५ किमी आहे. या कारमध्ये ८.० लीटर क्वाड टर्बो चार्ज्ड डब्ल्यू १६ इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन १२०० एचपीची शक्ती निर्माण करते.
६) एसएससी अल्टिमेट एरो टीटी
SSC Ultimate Aero TT या कारची टॉप स्पिड ४१२ किमी प्रति तास आहे. या कारमध्ये ट्विन टर्बो व्ही ८ इंजिन देण्यात आले आहे जे १२८७ एचपीची शक्ती देते.