6 Upcoming cars in March 2025 : तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मार्च २०२५ हा महिना तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. या महिन्यात भारतात अनेक जबरदस्त इलेक्ट्रिक आणि लक्झरी कार्स लाँच होणार आहेत. यामध्ये मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही ई विटारा, किआची ईव्ही६ फेसलिस्ट आणि मर्सिडीजची मेबॅक एसएल ६८० सारख्या कारचा समावेश आहे. मार्चमध्ये लाँच होणाऱ्या या सहा कारविषयी सविस्तर जाणून घेऊया.
१) Volvo XC90 फेसलिफ्ट
स्वीडिश कार उत्पादक कंपनी व्होल्वो ४ मार्च रोजी त्यांची लक्झरी एसयूव्ही XC90 चे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करणार आहे, या एसयूव्हीमध्ये हे दोन मोठे अपडेट असतील, जे तिला आणखी प्रीमियम कार बनवते.
डिझाइन अपडेट्स – नवीन ग्रिल, एलईडी डीआरएल, अपडेटेड बंपर आणि स्टायलिश अलॉय व्हील्स
इंटरनल अपडेट्स – नवीन ११.२ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
इंजिन ऑप्शन – ८ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह २.० लिटरचे पेट्रोल इंजिन
ही एसयूव्ही मर्सिडीज बेंझ जीएलई, बीएमडब्ल्यू एक्स ५, ऑडी क्यू ७ सारख्या लक्झरी कारला टक्कर देईल.
२) मारुती ई -विटारा – मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कार ई- विटाराची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. ही कार जानेवारी २०२५ मध्ये भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली होती, आता तिची किंमत आणि बुकिंग तपशील मार्चमध्ये उघड होऊ शकतात.
५०० किमीची मजबूत रेंज
४९ किलोवॅट प्रति तास आणि ६१ किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक पर्याय
142 bhp से 172 bhp पावर आउटपूट
ADAS टेक्नोलॉजीने सुसज्ज असलेली पहिली मारुती कार
ही कार थेट Hyundai Creta EV शी स्पर्शा करेल.
३) किआ ईव्ही६ फेसलिस्ट – अपडेटेड इलेक्ट्रिक एसयूव्ही
जागतिक बाजारपेठेतील लोकप्रिय इलेक्ट्रिक कार EV6 फेसलिस्ट लाँच केल्यानंतर Kia आता ही कार भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे.
नवीन एलईडी लायटिंग आणि डिझाईन अपडेट
इम्पोर्ट होऊन भारतात येईल.
जबरदस्त रेंज आणि स्मार्ट कनेक्टेड फीचर्स
४) एमजी सायबरस्टर – स्पोर्टी इलेक्ट्रिक कार
MG कंपनी त्यांची पहिली प्रीमियम इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार सायबरस्टरची किंमत जाहीर करण्याची शक्यता आहे.
फीचर्स – ५१० बीएचपी पॉवर आणि ७२५ एनएम टॉर्क
फक्त ३.२ सेकंदात ०-१०० किमी/ ताशी वेग
७७ किलोवॅट प्रति तास बॅटरीपासून ५७० किमी रेंज
ही कार एमजी सिलेक्ट प्रीमियम डीलरशिपद्वारे विकली जाईल.
५) एमजी एम९ ईव्ही- प्रीमियम इलेक्ट्रिक एमपीव्ही
एमजी लवकरच त्यांच्या एम९ इलेक्ट्रिक एमपीव्हीची किंमतदेखील जाहीर करू शकते.
मोठी तीन रोची फॅमिली कार
90 KWh बॅटरी – ५०० किमी रेंज
DC फास्ट चार्जिंग – ३० मिनिटांत ३० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज
६) Mercedes Maybach SL 680 – सुपर लक्झरी कार
Mercedes Maybach SL 680 ही कार १७ मार्चपर्यंत भारतात लाँच होईल, ही मेबॅकच्या सर्वात स्पोर्टी मॉडेलपैकी एक कार असेल.
४.० लिटर बाय टर्बो V8 इंजिन – ५७७ बीएचपी आणि ८०० एनएम टॉर्क
९ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन- AWD सिस्टम
रॉयल इंटिरियर आणि मेबॅक स्पेसिफिक डिझाईन.