Airbag safety for kids: रस्ते अपघातात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअरबॅग हे कारमधील सर्वात महत्त्वाचे सेफ्टी फीचर मानले जाते. पण, कधी कधी हेच फीचर लोकांचा जीवही घेते. नवी मुंबईतील एक ताजी घटना आहे, जिथे एअरबॅगमुळे एका सहा वर्षांच्या निष्पाप मुलाला आपला जीव गमवावा लागला. दोन कारच्या धडकेनंतर एअरबॅग उघडल्यावर सहा वर्षांच्या मुलाच्या मानेला जबर मार लागला, त्यामुळे त्याला गंभीर जखम होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेवरून हा प्रश्न पडतो की, एअरबॅग तुमच्या मुलांसाठीदेखील घातक ठरू शकतात का? आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

एअरबॅग म्हणजे काय

सर्वप्रथम आपण ‘AIRBAG’ म्हणजे काय हे समजून घेऊया. एअरबॅग हे सहसा पॉलिस्टरसारख्या मजबूत कापड किंवा फॅब्रिकपासून बनवलेले फुग्यासारखे आवरण (कवर) असते. अपघाताच्या वेळी प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी याला खास मटेरियलने डिझाइन केले असते. हे कारमधील सेफ्टी कुशनप्रमाणे काम करते. वाहनाला कोणताही आघात किंवा टक्कर होताच ही यंत्रणा सक्रिय होते.

Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Actor Vicky kaushal 25 kilos weight gain for Chhaava 80 to 105 kilos expert advice on weight gain
बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटासाठी वाढवलं २५ किलो वजन, तुम्हालाही वजन वाढवायचं असेल तर तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला ठेवा लक्षात
These simple tips will help to make a delicious food
जेवण बनवताना खूप धावपळ होते? ‘या’ सोप्या टिप्स रूचकर जेवण बनवण्यासाठी करतील मदत
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Two people died in accident on Peth road nashik
नाशिक : पेठ रस्त्यावरील अपघातात दोन जणांचा मृत्यू
how to protect and lock your aadhaar card
तुमचं आधार कार्ड सुरक्षित आहे का? लॉक करण्यासाठी अन् गैरवापर टाळण्यासाठी काय करायचं? जाणून घ्या…
Pimpri , fire, worker house, cash burnt, loksatta news,
पिंपरी : कामगाराच्या घराला भीषण आग, पाच लाखांची रोकड जळून खाक

एअरबॅग कशी काम करते

एअरबॅगला सप्लिमेंटरी रेस्ट्रेंट सिस्टम (SRS) असेही म्हणतात. अपघात होताच, एसआरएस प्रणालीमध्ये आधीच स्थापित केलेला नायट्रोजन वायू एअरबॅगमध्ये भरला जातो. ही संपूर्ण प्रक्रिया काही मिलिसेकंदात घडते. यानंतर एअरबॅग फुगते आणि प्रवाशांना उत्तम कुशनिंग (गादी) देऊन सुरक्षितता प्रदान करते.

हेही वाचा… टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाईची बोलती बंद! यावर्षी एकट्या मारुतीने केली सर्वाधिक कारची विक्री, आकडे पाहून व्हाल थक्क

एअरबॅगमध्ये जे छिद्र दिले जातात ते एअरबॅग उघडल्यानंतर गॅस सोडतात. या सर्व प्रक्रियेत वाहनांच्या शरीराच्या मजबुतीचीही काळजी घेतली जाते, जेणेकरून कोणत्याही अपघाताच्या वेळी, कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला जास्त नुकसान होणार नाही आणि वाहन स्वतःच जास्तीत जास्त धोका सहन करू शकेल, यासाठी कारचे शरीर मजबूत धातूचे बनलेले असते.

एअरबॅगचा वेग

अपघाताच्या तीव्रतेनुसार, एअरबॅग किती वेगात उघडते हे एअरबॅग कंट्रोल युनिट (ACU) द्वारे निर्धारित केले जाते. अपघात झाल्यास, क्रॅश सेन्सर (एक्सेलेरोमीटर) एअरबॅग कंट्रोल युनिटला सिग्नल पाठवतो. हे कंट्रोल युनिट इन्फ्लेशन डिव्हाईस सक्रिय करते, जे एअरबॅगमध्ये भरलेले सोडियम ॲझाइड (NaN3) आणि पोटॅशियम नायट्रेट (KNO3) यांचे मिश्रण प्रज्वलित करून नायट्रोजन वायू तयार करते.

दक्षिण कॅरोलिनाच्या क्लेमसन युनिव्हर्सिटीच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या तपशिलानुसार, अपघाताचा शोध घेणे आणि एअरबॅग पूर्णपणे उघडण्याचा वेग यामधील वेळ अंदाजे ०.०१५ सेकंद ते ०.०५० सेकंद आहे, तर एअरबॅगचा वेग ताशी ३०० किमी आहे.

तुम्ही डोळे मिचकावण्यापूर्वी एअरबॅग उघडते

एअरबॅग उघडण्याची सामान्य वेळ सुमारे ३० ते ५० मिलीसेकंद असते. सामान्य कार अपघाताची प्रक्रिया सुमारे १२० मिलीसेकंद चालते. डोळे मिचकावयला सुमारे १०० ते १५० मिलीसेकंद लागतात. सरासरी व्यक्ती एका मिनिटात १४ ते १७ वेळा डोळे मिचकावते. संगणक वापरताना किंवा काहीतरी वाचताना हा वेग कमी होतो आणि व्यक्ती एका मिनिटात ४ ते ६ वेळा डोळे मिचकावते.

हेही वाचा… बाकी कंपन्यांची उडाली झोप! पॅनोरॅमिक सनरूफ, ६ एअरबॅग्स अन्…, Kiaची नवीकोरी एसयूव्ही भारतात झाली लाँच

मात्र, नवी मुंबईतील ही घटना त्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे, जे निष्काळजीपणे लहान मुलांना गाडीत बसवतात. कारमध्ये मुलांना त्यांच्या वयानुसार बसण्याची व्यवस्था केली जाते. उदाहरणार्थ, लहान मुलांना कधीही पुढे बसवू नये. कारण त्यांच्या शरीराचे अवयव नाजूक असतात आणि कोणतीही दुर्घटना घडल्यास एअरबॅग उघडणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

वजन आणि आकारानुसार मुलांना कारमध्ये बसवण्याची योग्य स्थिती:

  • नऊ किलोपेक्षा कमी वजनाच्या मुलांनी नेहमी मागच्या सीटवर बसवावे. त्यांचा चेहरा मागील सीटच्या दिशेने असावा आणि त्यांना ISOFIX चाइल्ड सीटवर बसवले पाहिजे.
  • तुम्ही ९ ते १८ किलो वजनाच्या मुलाला फॉरवर्ड फेसिंग सीटवर बसवू शकता. अशा मुलांसाठीही ISOFIX चाइल्ड सीट वापरायला विसरू नका.
  • १८ किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या मुलांनी बूस्टर सीटबरोबर फ्रंट फेसिंग बसवून शोल्डर आणि लॅप सीट बेल्ट वापरावा.
  • ज्या मुलांची बसताना उंची ६३ सेमी (सुमारे २ फूट) किंवा त्याहून अधिक आहे, तेव्हा तुम्ही त्यांना मांडीवर बसवून त्यांच्या खांद्यावर सीटबेल्ट लावून त्यांना बसवू शकता.
  • जर तुम्ही मुलांसाठी एक्सटर्नल कार सीट वापरत असाल तर ते चांगल्या पोजिशनमध्ये लावा. जर नवजात मूल असेल तर ते एअरबॅगच्या बाजूला ठेवू नका.

Story img Loader