Best Mileage 7-Seater Car: भारतीय बाजारपेठेत एसयुव्ही कार्ससोबतच मोठ्या प्रमाणात सात कारची मागणी वाढली आहे. जर कुटुंब मोठे असेल आणि एकत्र प्रवास करताना त्रास होत असेल, तर कुटुंबासाठी मोठी कार हवी असते. भारतात या सेगमेंटमध्ये एकापेक्षा एक दमदार पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासाठी एखादी ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, आम्ही तुम्हाला मारुतीच्या अशा कारविषयी माहिती देणार आहोत, जी अनेक ग्राहकांच्या मनावर राज्य करीत आहे. ही सात सीटर कार तगडं मायलेज देत असून सर्वसामान्याना परवडेल अशा किमतीत बाजारात उपलब्ध आहे.
मारुतीच्या कार्सना देशातील बाजरपेठेत मोठी मागणी आहे. मारुती सुझुकी सात सीटर कारचीही विक्री करते. भारतीय बाजारात ही मारुतीची कार सर्वात जास्त विकली जाणारी ७ सीटर कारपैकी एक आहे. या कारमध्ये कंपनीने १.५ लीटर पेट्रोल इंजिन दिलं आहे जे माईल्ड हायब्रिड तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे. हे इंजिन १०३PS पॉवर आणि १३७Nm टॉर्क जनरेट करू शकतं. यात ५ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्सचे पर्याय देण्यात आले आहेत.
(हे ही वाचा : बाकी कंपन्यांचे उडाले होश, E20 पेट्रोलवरही धावणारी Yamaha ची नवी स्कूटर देशात दाखल, किंमत फक्त… )
‘या’ सात सीटर कारवर ग्राहक फिदा
आज आम्ही तुम्हाला मारुतीच्या अशा कारबद्दल सांगणार आहोत, ज्या कारची बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मारुतीच्या ‘या’ कारसाठी शोरुम्ससमोर नेहमी रांगा लागत असतात. Maruti Ertiga ही ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली कार आहे. मारुती एर्टिगाची सप्टेंबरमध्येही मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. मायलेज, किंमत आणि फीचर्समुळे ही कार लोकांना फार आवडू लागली आहे.
या कारचे पेट्रोल मॉडल २०.५१ kmpl चे मायलेज देते तर सीएनजीसह ही कार २६.१ किमी प्रति किलो इतकं मायलेज देते. या कारची किंमत ८.६४ लाखापासून सुरू होते आणि १३.०८ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. परंतु, या कारच्या CNG प्रकाराची किंमत १०.७३ लाख ते ११.८३ लाख रुपये आहे.