7 seater cars under 10 lakh: भारतात ७ सीटर कारची मागणी सातत्याने वाढत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे, या गाड्या आरामदायी आणि कुटुंबासह लांबच्या प्रवासासाठी अगदी सोयीस्कर ठरतात .अनेक कार कंपन्या भारतीय बाजारपेठेत ७ सीटर कार लॉन्च करतात, परंतु या कारच्या किंमती खिशाला परवडणाऱ्या नसतात. परंतु काही कार १० लाख रुपयांपेक्षादेखील कमी किमतीत उपलब्ध आहेत, ज्यामध्ये हाय-एंड कारसारखेच अनेक चांगले फीचर्स देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊया ५ सर्वोत्तम ७ सीटर कार, ज्या तुम्ही १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मारुती सुझुकी अर्टिगा (Maruti Suzuki Ertiga)

मारुती सुझुकी एर्टिगा तिच्या विश्वासार्हता आणि इंधन कार्यक्षमतेसाठी ओळखली जाते. ही कार पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. Ertiga मध्ये SmartPlay इन्फोटेनमेंट सिस्टम, ABS आणि एअरबॅग्ज सारखे फिचर्स आहेत जे सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारला उत्कृष्ट बनवतात. या कारची किंमत ८ लाख ते १० लाख रुपयांच्या दरम्यान सुरू होते, ज्यामुळे ही कार बजेट-फ्रेंडली आहे.

महिंद्रा बोलेरो (Mahindra Bolero)

महिंद्रा बोलेरो त्याच्या मजबूती आणि रफ अ‍ॅंड टफ फिचरसाठी ओळखली जाते. ही कार विशेषतः ग्रामीण भागात खूप लोकप्रिय आहे. यात १.५ लीटर डिझेल इंजिन असून त्याचे मायलेजही चांगले आहे.बोलेरोची सुरुवातीची किंमत सुमारे ९ लाख रुपये आहे, ज्यामुळे ती बजेटमध्येही बसते.

हेही वाचा… स्वस्तात मस्त! ‘या’ कारला बाजारात आहे मोठी मागणी, कमी बजेटमध्ये मिळेल फायदेशीर डील

रेनॉल्ट ट्रायबर (Renault Triber)

रेनॉल्ट ट्रायबर हे ७ सीटर कार सेगमेंटमधील एक उभरतं नाव आहे. या कारचे मॉड्युलर सीटिंग अरेंजमेट आणि स्मार्ट इंटीरियर्स याला खास बनवतात. यात १.० लीटर पेट्रोल इंजिन असून त्याची किंमत सुमारे ५.५० लाख रुपयांपासून सुरू होते. ट्रायबरचे मायलेज देखील खूप चांगले आहे, ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

महिंद्रा बोलेरो निओ (Mahindra Bolero Neo)

महिंद्रा बोलेरो निओ ही ७ सीटर कार आहे, ज्याची किंमत ९.९५ लाख ते १२.१५ लाख रुपये आहे. ही कार तिच्या मजबूती आणि विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते.

हेही वाचा… Flipkart Big Billion Days: बजेटची चिंता सोडा, १ लाखाच्या आत खरेदी करा या ‘बेस्ट ५’ बाईक्स, पाहा यादी

मारुती इको (Maruti eeco)

मारुती इको हा बजेट-फ्रेंडली पर्याय आहे, ज्याची किंमत ५.३२ लाख ते ६.५८ लाख रुपये आहे. ही कार कमी किंमत आणि चांगल्या मायलेजसाठी ओळखली जाते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 seater cars under 10 lakh these 5 best low budget family cars in india dvr