7 Seater CNG Cars in India: तुमचं कुटुंब मोठं असेल तर तुमच्यासाठी ७ सीटर कार एक प्रॅक्टिकल पर्याय ठरेल. या कार्सध्ये अधिक स्पेस मिळते. पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने सीएनजी कारकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. उत्तम मायलेजमुळे लोक सीएनजी कारला प्राधान्य देत आहेत. स्वस्त ५ सीटर सीएनजी वाहनांचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत, परंतु जेव्हा सात सीटरचा विचार केला जातो, तेव्हा पर्याय खूप मर्यादित आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच दोन सात सीटर सीएनजी कारबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किमतही तुमच्या बजेटमध्ये आहे आणि त्यांचे मायलेज २६ किमीपेक्षा जास्त असणार आहे. विशेष म्हणजे, दोन्ही गाड्या फक्त मारुती सुझुकीच्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दमदार ७ सीटर CNG कार 

Maruti Suzuki Ertiga

मारुती सुझुकी एर्टिगा ही देशातील सर्वात स्वस्त सात सीटर आहे जी CNG सह ऑफर केली जाते. ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी सात सीटर कार देखील आहे. यामध्ये तुम्हाला उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह एक प्रशस्त केबिन देण्यात आली आहे. कारमध्ये १.५ लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ८०७ Bhp आणि १२१ Nm टॉर्क निर्माण करते. यासोबतच सीएनजी किटचा पर्यायही उपलब्ध आहे. सीएनजीसह कारचे मायलेज २६.११ किमी प्रति किलो असल्याचा कंपनीचा दावा आहे. Maruti Ertiga CNG च्या VXI प्रकाराची किंमत १०.४४ लाख रुपयांपासून सुरू होते. ZXI व्हेरिएंटची किंमत ११.५४ लाख रुपये आहे.

(हे ही वाचा : टाटाच्या ६ लाखांच्या ५ सीटर कारनं Maruti-Hyundai सह सगळ्यांची लावली वाट, होतेय धडाक्यात विक्री )

Maruti Suzuki Xl6

दुसरी कार मारुती सुझुकी XL6 आहे, जी Ertiga पेक्षा अधिक प्रीमियम पर्याय आहे. Ertiga पेक्षा या ७ सीटर कारमध्ये बरेच चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. जरी ती एर्टिगासारखी ७ सीटर नसून ६ सीटर कार आहे.हे दिसण्यात एर्टिगापेक्षा अधिक प्रीमियम दिसते. कंपनीने ते आधीच सीएनजी पर्यायामध्ये लाँच केले आहे. याला Ertiga CNG सारखेच इंजिन मिळते, जे केवळ ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीच्या मते, तुम्हाला २६.३२ किमी/किलो मायलेज मिळणार आहे. मारुती XL6 CNG ची किंमत १२.२४ लाख आहे. ही किंमत एक्स-शोरूम आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 seater cng cars in india best cng cars maruti suzuki ertiga and maruti suzuki xl6 mileage 26km pdb