ऑडी या जर्मन लक्झरी कार निर्मात्या कंपनीने काही कालावधी आधी जागतिक स्तरावर ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन (Q8 e-tron) भारतात लॉन्च केली आहे. ऑडीने भारतात आपल्या या दोन नवीन कार लॉन्च करून आपली e-tron सेगमेंटचा विस्तार केला आहे. हे दोन्ही मॉडेल्स प्रत्येकी दोन ट्रिममध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ज्याची किंमत १.१३ कोटी (एक्स-शोरूम) रुपये इतकी आहे.

Audi Q8 e-tron : स्पेसिफिकेशन्स

ऑडी Q8 55 ई-ट्रॉन आणि ऑडी Q8 स्पोर्टबॅक 55 ई-ट्रॉन या दोन कार ११४ kWh बॅटरी पॅकसह ऑफर करण्यात आल्या आहेत. या दोन्ही कार एकदा चार्ज केल्यास ६०० किमी पर्यंत धावतात. तर ऑडी Q8 ५० ई-ट्रॉन आणि ऑडी Q8 स्पोर्टबॅक ५० ई-ट्रॉन एकाच चार्जिंगमध्ये ५०५ किमी पर्यंत धावतात. ऑडी Q8 ई-ट्रॉनमध्ये नवीन डिझाइन, चांगला परफॉर्मन्स, मोठी बॅटरी आणि चांगली ड्रायव्हिंग रेंज ऑफर करण्यात आली आहे. लॉन्च करण्यात आलेले ऑडी क्‍यू८ ५० ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ ५५ ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५० ई-ट्रॉन आणि ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५५ ई-ट्रॉन या चार व्हेरिएंटमध्ये सुधारित ड्रायव्हिंग फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

Accused in hit and run case in Ravet arrested Pune news
पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Election Commission, maharashtra Director General of Police, Rashmi Shukla
विश्लेषण : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना अखेर निवडणूक आयोगाने का हटविले?
Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स
sangeet manapman teaser release
Video : दिवाळीच्या मुहूर्तावर ‘संगीत मानापमान’चा टीझर प्रदर्शित, ‘या’ तारखेला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Commercial LPG Cylinder Price Hike by Rs 62
LPG Gas Cylinder : ऐन दिवाळीत व्यावसायिक सिलिंडर ६२ रुपयांनी महाग, घरगुती सिलिंडरच्या दरांची स्थिती काय?
Kasarwadvali Police, Thane, Kasarwadvali Police Station Electronic items, Kasarwadvali Police Station,
‘फुकट फौजदारां’कडून महागड्या वस्तूंचा वापर, मुंबई उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश
Maruti Suzuki Dzire 2024
Maruti Suzuki Dzire 2024 : दिवाळीनंतर नवी डिझायर येतेय ग्राहकांच्या भेटीला! जाणून घ्या हटके डिझाइन अन् भन्नाट फीचर्स

हेही वाचा : Hero, Bajaj चा खेळ खल्लास? Honda ची नवी बाईक बाजारात दाखल; मिळेल १० वर्षाची वाॅरंटी, किंमत फक्त…

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, “आज आम्‍ही आमच्‍या इलेक्ट्रिक गतीशीलतेच्या प्रवासामध्‍ये आणखी एक पाऊल उचलत आहोत. आम्‍हाला या आकर्षक इलेक्ट्रिक कार्स लॉन्च करण्‍याचा अधिक आनंद होत आहे. सर्वात मोठे बॅटरी पॅक्‍स अतिरिक्‍त रेंज देण्‍यासह मॉडेल्‍सच्‍या मूल्‍य तत्त्वामध्‍ये देखील वाढ करतात. नवीन उत्‍साहवर्धक स्‍टायलिंग रचनेमधील सुधारणांशी पूरक आहे आणि निश्चितच सर्वांचे लक्ष वेधून घेईल. ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन आमच्‍या इलेक्ट्रिक गतीशीलता धोरणामध्‍ये प्रमुख व्हेइकल आहे आणि आम्‍ही आमच्‍या लाइन-अपला इलेक्ट्रिफाईंग करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत असताना आम्‍हाला निर्मितीसाठी प्रबळ पाया देते. नवीन ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन आणि ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ई-ट्रॉनच्‍या सादरीकरणासह आमचा आता विभागामध्‍ये व्‍यापक ईव्‍ही पोर्टफोलिओ आहे.”

इंटेरिअर आणि फीचर्स

ऑडी Q8 e-tron मध्ये कंपनीने ग्राहकांसाठी सनरूफ, १५ स्पीकर ऑडिओ सिस्टीम, सीटला मसाज फंक्शन, लेदर इंटेरिअर, पार्क असिस्ट प्लस, ३डी व्ह्यू कॅमेरे, डिजिटल कॉकपीट आणि गेस्टर कंट्रोल बूट असे अनेक फीचर्स दिले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने विचार केल्यास Q8 ई-ट्रॉनमध्ये ८ एअरबॅग्स, लेन डिपार्चर वॉर्निंग, अँटी थेफ्ट व्हील बोल्ट आणि लूज व्हील वॉर्निंग तसेच ऑडी प्री-सेन्स बेसिक फिचर मिळते.

हेही वाचा : रेनॉकडून महाराष्‍ट्रात ‘रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज’ लाँच; ‘या’ ठिकाणी राबवण्‍यात येईल मोहिम

ऑडी क्यू8 55 ई-ट्रॉन आणि ऑडी क्यू8 स्पोर्टबॅक 55 ई-ट्रॉनमध्ये कंपनीने ड्युअल मोटर्स सिस्टीम दिली आहे. प्रत्येक एक्सलमध्ये ४०२ बीएचपी आणि ६६४ एनएम टॉर्क जनरेट करण्याची शक्ती मिळते. तर Q8 50 ई-ट्रॉन आणि ऑडी Q8 स्पोर्टबॅक 50 ई- tron मध्ये ९५kWh बॅटरी पॅकसह ३३५ बीएचपी आणि ६६४ एनएम टॉर्क जनरेट करणारे इंजिन मिळते. सर्व चार व्हेरिएंट्स २२ kW AC आणि १७० kW DC पॉवर पर्यंत चार्ज केले जाऊ शकतात. २० ते ८० टक्के चार्ज होण्यासाठी तर १० ते ८० टक्के चार्ज होण्यासाठी ३१ मिनिटांचा कालावधी लागतो.