8-Seater Cars In India: तुमच्या मोठ्या कुटुंबाला लांबच्या सहलीवर घेऊन जाण्यासाठी असो किंवा व्यावसायिक वापरासाठी असो, एमपीव्ही कारमध्ये उपलब्ध असलेल्या जास्त सीट्स तुमचे काम सोपे करते. भारतात उपलब्ध असलेल्या ७ सीटर कारची मोठी लिस्ट आहे. पण, जर तुम्हाला ७ सीट्सही कमी वाटत असतील तर आम्ही तुमच्यासाठी ८ सीटर कारची लिस्ट घेऊन आलो आहोत. विशेष बाब म्हणजे, या लिस्टमधील पहिली कार फक्त १६ लाख रुपयांमध्ये मिळते.

स्वस्तात खरेदी करा ‘या’ ८ सीटर कार

Mahindra Marazzo

Marazzo MPV भारतातील सर्वात सुरक्षित कार पैकी एक आहे. कंपनी याला ४ स्टार रेटिंग सोबत लाँच करते. याचा डिझाइन शार्क माशाने प्रेरित आहे. यात शार्क टेल सारखे टेल लँम्पचा समावेश आहे. या कारची किंमत १४.१० लाख रुपयांपासून सुरू होते. याला १.५-लिटर डिझेल इंजिन मिळते, जे १२२PS/३००Nm जनरेट करते. हे ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. हे फक्त डिझेल इंजिनसह येते.

Alankrita Sakshi’s Success Story
Alankrita Sakshi : अलंकृतासारखे तुम्हीही Google मध्ये नोकरी मिळवू शकता; बीटेक, मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम अन् या आयटी स्कीलच्या जोरावर मिळवले ६० लाखांचे पॅकेज
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
90s Kid: Did You Experience These Things in Childhood?
९० च्या दशकातील मुलांनो, तुम्ही या गोष्टी बालपणी पाहिल्यात का? VIDEO होतोय व्हायरल
reserve bank of india uli marathi news
विश्लेषण: रिझर्व्ह बँकेची ‘युनिफाइड लेंडिंग इंटरफेस (यूएलआय)’ प्रणाली काय आहे? तिचा कर्जदारांना फायदा काय?
security personnel slap scooter driver
VIDEO : दुचाकी विरुद्ध दिशेने चालवल्याने जवानाचा लाठीहल्ला; कारच्या डॅशकॅममध्ये घटना कैद
TV actor Moshin Khan says fatty liver caused a heart attack
अभिनेता मोहसिन खानला ३१ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका! फॅटी लिव्हरसाठी ‘या’ वाईट सवयी ठरल्या कारणीभूत, वाचा डॉक्टरांचे मत
ondc launches digital credit services
‘ओएनडीसी’वरून आता खेळत्या भांडवलासाठी डिजिटल कर्ज
loksatta kutuhal efficient and intelligent humanoid robots of future
कुतूहल : भविष्यातील कार्यक्षम आणि बुद्धिमान ह्यूमनॉइड

(हे ही वाचा : दोन CNG सिलेंडर असलेल्या टाटाच्या सुरक्षित कारसमोर Baleno विसरुन जाल, बुटस्पेसही जबरदस्त, मायलेज २५ किमी )

Toyota Innova Crysta

Toyota Innova Crysta ही कार खूप लोकप्रिय आहे. वर्षानुवर्षे ते ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. त्याच्या ८-सीटर व्हेरिएंटची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरू होते. देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या MPV मध्ये याचा समावेश आहे. हे ७ आणि ८ सीटर पर्यायांमध्ये येते. सध्या याला फक्त डिझेल इंजिन मिळते.

Toyota Innova Hycross

हे ७ आणि ८ सीटर पर्यायांमध्ये देखील येते. त्याच्या ८ सीटर व्हेरियंटची किंमत १८.८७ लाख रुपयांपासून सुरू होते. इनोव्हा हायक्रॉस VX (O) आवृत्ती २.०-लिटर NA पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे, जी इलेक्ट्रिक मोटरसह जोडलेली आहे. इंजिन १७२bhp आणि १८८Nm टॉर्क निर्माण करते, तर इलेक्ट्रिक मोटर अतिरिक्त ११bhp आणि २०६Nm आउटपुट करते.

(हे ही वाचा : कुठल्या ई-स्कूटर्स लायसन्स नसलं तरी चालवता येतात माहितेय का? पाहा यादी… )

Maruti Invicto

Invicto मध्ये ७ आणि ८ सीटर पर्याय देखील आहेत. त्याच्या 8-सीटर व्हेरिएंटची किंमत २४.८४ लाख रुपये आहे. फक्त एक पॉवरट्रेन असून हायब्रिड सेटअपसह २-लीटर पेट्रोल इंजिन पर्याय देण्यात आला आहे. ही इनोव्हा हायक्रॉसवर आधारित एमपीव्ही आहे.

Lexus LX

या कारची किंमत सुमारे २.६३ कोटी रुपये आहे. हे अतिशय शक्तिशाली इंजिन आणि मजबूत वैशिष्ट्यांसह येते. त्यात ८ लोक बसू शकतात. हे ५६६३cc इंजिनद्वारे समर्थित आहे, जे ३६२bhp आणि ५३०Nm आउटपुट करू शकते. हे ०-१००kmph ७.७ सेकंदात वेग मिळवू शकते.