एका कार चालकाला त्याच्या वाहनाच्या दरुस्तीसाठीचा अंदाजी खर्च हा चक्क २२ लाख रुपये सांगण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही किंमत त्याच्या वाहनाच्या किंमतीपेक्षा दुप्पट आहे. अनिरुद्ध गणेश असे या व्यक्तीचे नाव आहे. खर्च पाहून नाराज झालेल्या गणेशने आपली खदखद नंतर लिंक्डइनवर व्यक्त केली.
अनिरुद्ध यांच्याकडे ११ लाख रुपये किंमतीची व्होल्क्सवॅगनची पोलो ही कार आहे. बंगळुरूमध्ये नुकत्याच आलेल्या पुरामध्ये त्यांच्या कारचे नुकसान झाले होते. कार पाण्यात बुडाली होती. मग दुरुस्तीसाठी तिला व्हाईटफिल्ड येथील अॅपल ऑटो या ठिकाणी पाठवले. २० दिवसांनंतर त्यांना त्यांच्या कारच्या स्थितीबाबत माहिती मिळाली. कारच्या दुरुस्तीसाठी २२ लाख रुपये अंदाजी खर्च सांगण्यात आला. ही फार धक्कादायक बाब होती. कारण वाहनाची किंमत केवळ ११ लाख इतकी होती.
(वाहनातून निघणाऱ्या काळ्या धुराच्या समस्येला गांभीर्याने घ्या, ‘हे’ करा, अन्यथा होईल मोठे नुकसान)
नंतर अनिरुद्ध यांनी या विषयी बिमा कंपनीशी संपर्क केला. यावर त्यांनी ‘कार लॉस’ झाल्याचे नमूद करण्यात येईले, तसेच कार दुकानातून आणली जाईल, असे सांगितले. बाजारात कारचे मुल्य केवळ ६ लाखच असल्याचे अनिरुद्ध यांना समजले. अशात त्यांना पुन्हा निराश करणारी माहिती मिळाली.
बिघाड झालेल्या कारचे कागदपत्र देण्यासाठी कंपनीने परत ४४ हजार रुपयांचा अंदाजित खर्च मागितल्याचा आरोप अनिरुद्ध यांनी केला आहे. जो की बाजार भावानुसार केवळ ५ हजार रुपये इतका असतो. या सर्व बाबींनी संतापून गणेश यांनी झालेल्या घटनेची माहिती लिंक्डइनवर शेअर केली.
अनिरुद्ध यांची पोस्ट समाज माध्यमावर प्रचंड चालली. ११ लाख रुपये किंमतीच्या कारचा दुरुस्ती खर्च २२ लाख रुपये येणे हे खरच आश्चर्यचकित करणारे आहे. दरम्यान, अनिरुद्धने आपली लिंक्डइन पोस्ट अपडेट करून नंतर व्होल्क्सवॅगन कंपनीने आपली समस्या सोडवल्याचे सांगितले आहे.