सोशल मीडियावर (Social Media) कधी-कोणता व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होईल, काही सांगता येत नाही. काही व्हिडीओमध्ये लोकांची क्रिएटिव्हीटी दिसून येते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

थंडीच्या ऋतूत आंघोळीसाठी थंड पाणी सर्वांनाच नकोसे होते आणि त्यात जर तुमच्याकडे पाणी गरम करण्यासाठी काही साधन उपलब्ध नसेल तर थंड पाण्याने आंघोळ करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरत नाही. पाणी गरम करण्यासाठी हिटर, गिझरचा वापर केला जातो. परंतु काही मुलांनी युक्ती लढवून पाणी गरम करण्यासाठी चक्क कारचा वापर केलाय.

(हे ही वाचा : शानदार ऑफर! केवळ १ लाखांमध्ये घरी आणा Maruti WagonR CNG कार, महिन्याला भरा केवळ ‘इतका’ EMI )

पाणी गरम करण्यासाठी केलाय हटके प्रयोग

मिस्टर इंडियन हॅकर अनेकदा कोणता ना कोणता प्रयोग करुन काही तरी नवीन भन्नाट व्हिडीओ शेअर करत असतो. आता या नव्या व्हिडीओमध्ये चक्क मारुती कारचा वापर करुन पाणी गरम करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, २ मारुती कार दिसत आहेत. या दोंन्ही कारचा वापर पाणी गरम करण्यासाठी आला. चला तर जाणून घेऊया मारुती कारचा पाणी गरम करण्यासाठी कसा वापर करण्यात आला.

मारुती कारचे वॉटर हीटरमध्ये रूपांतर

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका मोठ्या तलावातील पाणी गरम करण्यासाठी एक सात ते आठ मुलांची टीम एकत्र जोडलेल्या दोन मारुती कार घेऊन येतात. या दोंन्ही कारचा वापर प्रयोगासाठी करण्यात येतो. यात मारुती 800 हे जुने मॉडेल वापरण्यात आले आहे. या व्हिडीओत दोन पाईप (इनलेट आणि आउटलेट) पाण्याला जोडलेले दिसत आहेत. इंजिनच्या माध्यमातून ते पाणी गरम करताना दिसत आहेत. टीमने रात्रभर गाड्यांचे इंजिन सुरु ठेवले आणि सुमारे पाच हजार लिटर पाणी गरम करण्यात आले.

(हे ही वाचा : Auto Expo 2023: जानेवारीमध्ये Maruti Suzuki करणार धमाका; सोबतच इलेक्ट्रिक कारही येणार )

हे पाहणे मनोरंजक आहे की, तंत्राचा वापर करून पाणी गरम केले गेले आहे. सुमारे पाच हजार लिटर पाणी गरम करण्यात त्यांना यश आले. या अनोख्या प्रयोगाबद्दल त्यांचे कौतुकही केले जात आहे.