Car Theft Important Tips: दिवसेंदिवस कारच्या किमती वाढत असल्या तरीही दरवर्षी लाखो लोक कार विकत घेतात. परंतु, अनेकदा कार मालकांच्या हलगर्जीपणामुळे कार चोरीला जातात. आजवर अशा अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील, ज्यात मालकाने गाडीकडे दुर्लक्ष केल्यामुळे महागड्या कार एका रात्रीत लंपास केल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमची कार चोरी होण्यापासून वाचवू शकता.

कार चोरी होण्यापासून वाचवण्यासाठी उपाय

सगळ्यात आधी तुम्ही कार नेहमी सुरक्षित आणि योग्य ठिकाणी पार्क करा. तुमची कार जास्त लोकवस्तीच्या ठिकाणी पार्क करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे कार चोरीला जाण्याचा धोका कमी होईल.

Tata Motors January Offer
Tata Motors January Discount : ग्राहकांसाठी खुशखबर! टाटा पंच ईव्ही अन् टाटा टियागो ईव्ही वर ८५ हजारांपर्यंत डिस्काउंट, जाणून घ्या सविस्तर
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…”
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजनेचं आश्वासन महायुती कसं निभावणार? सत्ता स्थापनेनंतर महिनाभरातच का प्रश्न उपस्थित होतायेत?
Modi Kamath podcast
PM Modi Om Memes With Giorgia Meloni : “वो तो चलता रहता है”, PM मोदींचे इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याबरोबरच्या मीम्सवर भाष्य
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Sambhal Jama mosque
संभल येथील जामा मशिद परिसरातील विहिरीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मंदिर की मशिदीला मिळणार पाणी?

त्यानंतर दरवाज्यांव्यतिरिक्त खिडक्यादेखील लॉक करणे खूप गरजेचे आहे. रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्यापैकी काही जण हवा यावी यासाठी कारच्या खिडक्या उघड्या ठेवतात. मात्र तुम्ही घाट, जंगल किंवा अज्ञात जागेवर प्रवास करत असल्यावर खिडक्या पूर्ण बंद करा.

बऱ्याचदा रात्रीच्या वेळी प्रवास करताना किंवा रात्री गाडी पार्क केल्यावर कार चोरीला जाण्याची शक्यता असते. अशावेळी तुमची कार चोरीला जाण्यापासून वाचवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या कारचे दरवाजे लॉक करा.

स्टीयरिंग व्हील लॉक, आफ्टरमार्केट अलार्म किंवा GPS ट्रॅकिंग डिव्हाइस स्थापित करणे चोरांना कार चोरीपासून परावृत्त करू शकते आणि तुमची कार चोरीला गेल्यास ते पुनर्प्राप्त करण्यात मदत करू शकते.

काही कार निर्माते मालकांना fob द्वारे पाठवलेले सिग्नल निष्क्रिय करण्याची परवानगी देतात. Ford, Honda आणि Audi साठी सिग्नल बंद करण्याचा योग्य मार्ग शोधण्यासाठी मालक त्यांच्या कारची टचस्क्रीन वापरू शकतात. हे कसे करायचे याची खात्री करण्यासाठी तुमच्या कारच्या मालकाचे मॅन्युअल वाचा.

हेही वाचा: ‘या’ सोप्या टिप्स लक्षात घेतल्यास कार आणि बाईकचा टायर चालेल दीर्घकाळ

कारमध्ये अलार्म सिस्टीम वापरण्याची आणि स्टीयरिंग व्हील लॉकसारखे दृश्य चोरीविरोधी उपकरण वापरण्याची शिफारस केली जाते. जर तुमची कार अलार्म सिस्टमसह आली नसेल, तर तुम्ही नंतर एक अलार्म सिस्टम लावून घेऊ शकता.

कारमध्ये मौल्यवान वस्तू ठेवणे टाळा. तुमच्या कारमध्ये लॅपटॉप, फोन, टॅब्लेट किंवा इतर वस्तू पाहून चोर हमखास कारमधील गोष्टींची चोरी करू शकतो.. तुमच्या कारमध्ये मौल्यवान वस्तू कधीही ठेऊ नका किंवा हा उपाय तुम्ही करू शकत नसल्यास या वस्तू कारमध्ये पूर्णपणे लपवून ठेवा.

Story img Loader