Car Care Tips in Summer: कारमध्ये पाण्याची बाटली ठेवणे सामान्य आहे. विशेषतः उन्हाळ्यात लोकांना पाण्याची आवश्यकता असते त्यामुळे नेहमी ते स्वत:बरोबर पाण्याची बाटली ठेवतात. कार वापरणारे लोकही नेहमी पाण्याची बाटली कारमध्ये ठेवतात जेणेकरून त्यांना तहान लागल्यावर ती पाणी पिऊ शकतील. पण, कारमध्ये ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीमुळेही आग लागू शकते हे तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या एका चुकीमुळे कार आगीमध्ये जळून खाक होऊ शकते. तुम्हाला हे ऐकून विचित्र वाटेल पण हे खरे आहे. तुम्ही विचार करत असाल की, पाणी हे ज्वलनशील पदार्थ नाही, मग ते कारला आग कशी लावू शकते. हे कसे घडू शकते ते चला जाणून घेऊ या…
हे कसे घडते?
खरं तर, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर भिंगाप्रमाणे काम करू शकतात आणि कारच्या आत आग लावू शकतात. विशेषतः जेव्हा कार तेजस्वी सूर्यप्रकाशात पार्क केली जाते. जेव्हा सूर्याची किरणे प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीतून जातात तेव्हा ती खूप पातळ होते. हे किरण कारच्या आतील लेदर पार्ट्स जसे सीट कव्हर, डॅशबोर्ड किंवा इतर गोष्टींना आग लावू शकतात.
हेही वाचा – दुबई पोलिस चालवणार Tesla Cybertruc; पोर्श, फेरारी सारख्या गाड्या आहेत त्यांच्या ताफ्यात
आग लागण्याचा धोका कधी वाढतो?
कारमध्ये पाण्याच्या बाटलीला आग लागण्याचा धोका असतो, विशेषतः जेव्हा कार तीव्र सूर्यप्रकाशात पार्क केली जाते. गाडीत पाण्याची बाटली अशा ठिकाणी ठेवली की जिथे सूर्यकिरण थेट त्यावर पडतात, तर आग लागण्याची शक्यता वाढते.
हेही वाचा – Skodaने भारतात लॉन्च केली Kushaq Mid-Spec Onyx, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंटसह मिळतील ही’ खास वैशिष्ट्ये
प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीमुळे कारमध्ये आग लागू नये म्हणून काय दक्षता घ्यावी?
कारमध्ये पाण्याची बाटली ठेवू नका
संरक्षणाची ही सर्वोत्तम पद्धत आहे. जर तुम्ही तुमच्याबरोबर पाण्याची बाटली घेऊन जात असाल तर ती गाडीच्या आत ठेवू नका.
दरवाजाच्या चौकटीत ठेवा
जर तुम्ही कारमध्ये पाण्याची बाटली ठेवली असेल तर ती थेट सूर्यप्रकाश पडेल अशा ठिकाणी ठेवू नका. जसे की डॅशबोर्ड किंवा गियर जवळ ठेवू नका. त्याऐवजी तुम्ही पाण्याची बाटली गाडीच्या दारात बनवलेल्या जागेत ठेवू शकता. प्रत्येक गाडीच्या दारात पाण्याची बाटली ठेवण्यासाठी जागा आहे.
बाटली झाकून ठेवा
गाडीत पाण्याची बाटली ठेवली तरी ती झाकून ठेवा. यामुळे सूर्यप्रकाश थेट बाटलीवर पडणार नाही आणि ते लेन्सप्रमाणे काम करेल नाही. हवे असेल तर बाटलीवर कापड लावू शकता.
कार सावलीत पार्क करा
आपली कार नेहमी सावलीत पार्क करण्याचा प्रयत्न करा. यामुळे कारमधील तापमान कमी राहील आणि आग लागण्याचा धोकाही कमी होईल.