देशात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून जीवितहानी होत आहे. वाहतूक नियमांचे पालन न करण्याबरोबरच सुरक्षा उपायांचा अवलंब न करणे हे देखील अपघातांमागील एक कारण आहे. त्यामुळे, कार चालवण्यापूर्वी सुरक्षेसाठी सीट बेल्ट लावले पाहिजे, त्याचबरोबर उच्च वेगाने वाहन चालवण्याचे टाळले पाहिजे. यासह अजून काही उपाय केल्यास तुम्ही अपघातांपासून सुरक्षित राहू शकता.
काही लोक वाहनाच्या आत मोठ्या प्रमाणात एक्सेसरीज ठेवतात. वाहनाच्या केबिनला आलिशान बनवण्यासाठी आणि उत्तम ड्रायव्हिंगचा अनुभव घेण्यासाठी या एक्सेसरीज किंवा वस्तू ठेवल्या जातात. मात्र, त्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकतात. अपघाताला आमंत्रण देऊ शकतात अशा कोणत्या वस्तू कॅबिनमध्ये ठेवू नये याबाबत आज आपण जाणून घेऊया.
(टीव्हीएसच्या ‘या’ ई स्कुटरला लोकांची प्रचंड पसंती, एका दिवसात २०० स्कुटर्सची डिलिव्हरी)
१) हँगिंग एक्सेसरीज
वाहन आतून आकर्षक दिसावे यासाठी हँगिंग एक्सेसरीजचा वापर केला जातो. मात्र, हँगिंग एक्सेसरीजमुळे अनेकवेळा व्हिजिबिलिटीची समस्या निर्माण होते. कारसमोरील दृष्य पाहण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे दुर्घटना देखील होऊ शकते. त्यामुळे कारमध्ये हँगिंग एक्सेसरीज लावायचे टाळले पाहिजे.
२) डॅशबोर्डची सजावट
डॅशबोर्डची सजावट टाळा. काही लोक डॅशबोर्डवर वस्तू बसवून त्यास सजवतात. याने डॅशबोर्ड आकर्षक वाटत असले तरी ते अपघाताला आमंत्रण देऊ शकते. डॅशबोर्डची सजावट केल्याने व्हिजिबिलिटीवर परिणाम होतो. कार समोरील दृष्य व्यवस्थित न दिसल्यास अपघात होऊ शकतो.
(सीएनजी वाहनाची ‘अशी’ करा देखभाल, सुरक्षित होईल प्रवास, इंजिनलाही होणार नाही नुकसान)
३) कार स्टेअरिंग एक्सेसरीज
स्टेअरिंग आकर्षक आणि आरामदायी बनवण्यासाठी लोक त्याला रंगीत कव्हर घालतात, मात्र त्याचेही तोटे आहेत. स्टिअरिंग ग्रीप स्टिअरिंगला चांगले लूक देत असले तरी ते धोकादायक ठरू शकते. स्वस्त आणि कमकुवत स्टिअरिंग ग्रीपची व्हिलवर व्यवस्थित पकड नसते. पकड नसलेले ग्रीप वळण घेताना घसरू शकतात, ज्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटू शकते.
४) धुम्रपान
वाहनामध्ये धुम्रपान करू नये. धुम्रपान केल्याने केबिनमधील वातावरण खराब होते, तसेच सोबत बसलेला प्रवाशीही पॅसिव्ह स्मोकिंगचा बळी ठरू शकतो.