८०-९० च्या दशकात आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावणारा अभिनेता गोविंदा. बॉलिवूडचा ‘हिरो नंबर वन’ म्हणून त्याची ओळख आहे. त्याचा हटके डान्स आणि कॉमेडीच्या परफेक्ट टायमिंगवर लोक फिदा होते आणि आजही आहेत. आज २१ डिसेंबर २०२२ गोविंदाचा वाढदिवस. फार कमी लोकांना माहिती आहे की, गोविंदाला महागड्या वाहनांची खूप आवड आहे. चला तर आज आपण जाणून घेऊया गोविंदाकडे कोणकोणत्या महागड्या कार आहेत.
गोविंदा ‘या’ महागड्या कारचा मालक
गोविंदाला महागड्या वाहनांची खूप आवड आहे. त्याच्याकडे १५ लाख रुपयांची Hyundai Creta ३४ लाख रुपयांची Toyota Fortuner आणि ३६ लाख रुपयांची फोर्ड एंडेव्हर आहे. या व्यतिरिक्त गोविंदाकडे काही हाय-एंड लक्झरी कार देखील आहेत, ज्यात Mercedes C220D ज्याची किंमत आहे ४३ लाख रुपये आणि Mercedes Benz GLC ज्याची किंमत ६४ लाख रुपये आहे.
(हे ही वाचा : मुकेश अंबानी वापरतात सेकंड हँड कार; Tesla Model S कारबद्दल तुम्हाला माहितेय का? )
गोविंदा हा बॉलिवूडधील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि एकापेक्षा एक आव्हानात्मक भूमिका साकारत त्याने सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ९० च्या दशकात गोविंदाचा डान्स म्हणजे मायकल जॅक्सनपेक्षा कमी नव्हता. अभिनयाबरोबरच गोविंदा डान्समध्ये इतका परफेक्ट आहे की आजची त्याच्या चित्रपटाची गाणी आणि गोविंदाच्या साईन स्टेप लोकांना लख्ख आठवतात. गोविंदाने ‘इल्जाम’ या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं.